Marathi News : आजकाल गुंतवणुकीचे महत्व चांगलेच अधोरेखित झाले आहे. तरुणांमध्ये गुतंवणूकीची सजगता निर्माण झाली आहे. सध्या मार्केटमध्ये अनेक गुंतवणुकीच्या योजना आहेत. परंतु यातील अनेक धोकादायक ऑप्शन आहेत.
परंतु ज्यांना कोणतीही रिस्क घ्यायची नसते व ग्यारंटेड रिटर्न हवे असेल असे लोक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या किंवा पोस्ट ऑफिस प्लॅनमध्ये गुंतवणूक करत असतात. सध्या पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची फिक्स डिपॉझिट
या दोन्ही स्कीम चर्चेत आहेत. तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर या दोघांपैकी कोणत्या योजनेत गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आहे? जास्त व्याजाचा लाभ कुठे मिळतो? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात.
* पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीममध्ये मध्ये 1 वर्षांसाठी पैसे गुंतवले तर त्यावर 6.90 टक्के व्याजदर सध्या मिळत आहे. जर तुम्ही 2 वर्षांसाठी किंवा 3 वर्षांसाठी FD केली तर तुम्हाला 7 टक्के व्याज मिळेल.
* स्टेट बँक ऑफ इंडियाची फिक्स डिपॉझिट
स्टेट बँक ऑफ इंडियाची फिक्स डिपॉझिट योजना जर पाहिली तर विविध कालावधीनुसार वेगवेगळे व्याजदर यात मिळत आहेत. जर 2 ते 3 वर्षांसाठी एफडी केली तर त्यावर 7 टक्के व्याजाचा लाभ मिळतो. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याज मिळते.
बँकेच्या फिक्स डिपॉझिट अंतर्गत असणाऱ्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करून, तुम्ही 7.10 टक्के व्याज मिळेल. तर ज्येष्ठ नागरिकांना FD वर 7.60 टक्के व्याजदराचा लाभ मिळतो.
* काय फायदेशीर
पोस्ट ऑफिस आणि SBI दोन्हीमध्ये ग्राहकांना 2 वर्षांच्या कालावधीसाठी समान व्याजदराचा लाभ मिळतोय. जर एखाद्या ग्राहकाने SBI च्या अमृत कलश योजनेंतर्गत गुंतवणूक केली तर त्याला 7.10 टक्के उच्च व्याजदराचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार यात गुंतवणूक करू शकता.
* रिस्क फ्री गुंतवणूक
या दोन्ही गुंतवणूक एकदम रिस्क फ्री आहेत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आदींमध्ये रिटर्न खूप असतात. परंतु त्यात मिळणारे रिटर्न हे ग्यारंटेड नसतात. इतर काही नवीन कंपन्या हे पैसे घेऊन पळून जाण्याचाही घटना घडल्या आहेत. त्यामुळे बँक व पोस्टमधील योजना अत्यंत रिस्क फ्री आहेत. व उत्तम व ग्यारंटेड रिटर्न देखील देत आहेत.