Silver Price:- गेल्या काही दिवसापासून आपण बघितले तर सोने आणि चांदीच्या दराने कधी नव्हे एवढी उच्चांकी पातळी गाठल्याचे चित्र आपण बघत आहोत. सोने व चांदीची खरेदी जवळपास सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर गेल्याचे सध्या चित्र आहे. त्यामुळे सोन्या चांदीची खरेदी करावी की नको असा देखील प्रश्न आता पडत आहे व हा प्रश्न खरेदीदार नाही तर गुंतवणूकदारांना देखील पडतांना आपल्याला दिसून येत आहे.
सोन्याच्या दरात वाढ होतच आहे, परंतु चांदीच्या किमतींमध्ये देखील मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात चांदीत आणखीन वाढ होईल की नाही हे देखील पाहणे खूप महत्त्वाचे आहे व एका ब्रोकरेज हाऊसचा जर आपण अहवाल बघितला तर त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत असून लवकरच चांदीची किंमत प्रति किलो एक लाख 25 हजार रुपये पर्यंत जाईल अशी शक्यता देखील या अहवालात वर्तवण्यात आलेली आहे.त्यामुळे चांदीची खरेदी करावी की नाही? हा देखील एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
चांदीचे दर जाऊ शकतात 1 लाख 25 हजार रुपयापर्यंत
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सध्या चांदीची किंमत एक लाख रुपयांच्या आसपास असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये चांदीच्या दरात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता असून चांदीचे दर एक लाख 25 हजार रुपये प्रतिकिलो पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रसिद्ध असलेल्या मोतीवाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने एक अहवाल दिला असून यामध्ये चांदीच्या किमतींबाबत एक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
या अहवालामध्ये सांगितले गेले आहे की गुंतवणूकदारांना जर चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर घसरण झाल्यास चांदीची खरेदी करावी असा सल्ला देखील देण्यात आलेला आहे. या फायनान्शिअल सर्विसने चांदीबाबतचा त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध केला असून चांदीच्या दरामध्ये घट झाल्यावर चांदीची खरेदी करण्याचा सल्ला या माध्यमातून देण्यात आला आहे.
या ब्रोकरेज हाऊसच्या एका रिसर्च नोटनुसार पाहिले तर अलीकडच्या काळामध्ये चांदीच्या किमतीमध्ये तब्बल 30 टक्क्यांची वाढ झाली आहे व त्यामुळे आधीच्या दरात जर घसरण पाहायला मिळाली तर ती खरेदीची संधी समजून चांदी खरेदी करणे गरजेचे आहे. या ब्रोकरेज हाऊसच्या माध्यमातून 86 हजार ते 86 हजार 500 ही चांदीची प्रमुख आधार पातळी असल्याचे सांगण्यात आलेले आहे.
सोने चांदीच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदी या मौल्यवान धातूच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ पोहचत आहे. विशेष म्हणजे सामान्य लोकांना सोन्या-चांदी घेणे जवळजवळ अशक्य झाल्याचे सध्या चित्र आहे. सोने आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते व हा एक गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय मानला जातो.
त्यामुळे मोठ मोठ्या बँका व संस्थांच्या माध्यमातून सोन्याची खरेदी केली जात आहे. परंतु सर्वसामान्य ग्राहकांनी मात्र सध्या सोने-चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आता त्याने सोने व चांदीच्या दारात वाढ होत असल्यामुळे सोने आणि चांदीची खरेदी करावी की नाही हा देखील एक मोठा प्रश्न पडलेला आहे.