आर्थिक

SIP Mutual Fund : रोज 100 रुपये वाचवून बना करोडपती; अशी करा गुंतवणूक !

Published by
Sonali Shelar

SIP Mutual Fund : श्रीमंत होण्याचे स्वप्न सर्वचजण पाहतात, पण सर्वांचे हे स्वप्न पूर्ण होईल असेल नाही, पण जर तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर नक्कीच तुम्ही तुमचे हे स्वप्न काही वर्षातच पूर्ण करू शकाल. आज आम्ही अशाच एका गुंतवणुकीबद्दल सांगणार आहोत जी तुम्हाला काही वर्षातच श्रीमंत करेल.

तुम्ही अगदी थोडी रक्कम जमा करून तुमचे हे स्वप्न पूर्ण करू शकता. SIP मध्ये दरमहा थोडी बचत करून तुम्ही भविष्यात तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता.

तुम्ही दरमहा तुमच्या पगारातून तुमच्या बचतीचा एक छोटासा भाग SIP मध्ये गुंतवू शकता. दीर्घ कालावधीसाठी येथे गुंतवणूक करून, तुम्ही तुमचे लक्षाधीश होण्याचे स्वप्न देखील पूर्ण करू शकता. तुम्ही दररोज 100 रुपये वाचवलेत तरीही तुम्ही काही वर्षांतच तुम्ही स्वतःला करोडपती बनवू शकता आणि तुमचे भविष्य सुधारू शकता. कसे ते जाणून घ्या…

जर तुम्ही दररोज 100 रुपयांची बचत केली तर तुमचे एका महिन्यात 3000 रुपये वाचतील. तुम्ही ही रक्कम SIP मध्ये सतत 30 वर्षे गुंतवता. तज्ञांच्या मते, दीर्घकालीन SIP वर सरासरी 12 टक्के परतावा सहज मिळू शकतो. SIP कॅल्क्युलेटर नुसार, तुम्ही 30 वर्षात फक्त 10,80,000 रुपये गुंतवाल, तर 12 टक्के व्याज म्हणून तुम्हाला 95,09,741 रुपये मिळतील. अशा स्थितीत 30 वर्षांनंतर तुम्ही 1,05,89,741 रुपयांचे मालक व्हाल.

आजच्या काळात 3,000 रुपये ही इतकी मोठी रक्कम नाही की ती कशीही वाचवता येणार नाही. आर्थिक नियम सांगतो की, तुम्ही तुमच्या उत्पन्नातील किमान 20 टक्के बचत करून गुंतवणूक करावी. तुम्ही महिन्याला 15,000 रुपये कमावले तरी त्यातील 20 टक्के म्हणजे 3,000 रुपये तुम्ही गुंतवले पाहिजे.

तुमचे उत्पन्न कालांतराने वाढेल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला एसआयपीसाठी दरमहा 3,000 रुपये काढणे फारसे अवघड जाणार नाही. तुमचे उत्पन्न वाढवल्यानंतर, तुम्ही SIP सुरू ठेवून इतर गुंतवणूक पर्याय सहजपणे निवडू शकता आणि तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.

Sonali Shelar