Small business ideas : घरबसल्या सुरु करा ‘हा’ व्यवसाय! कमी गुंतवणुकीत करता येईल लाखोंची कमाई, कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small business ideas : सध्या नोकरी सोडून व्यवसाय सुरु करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर तुम्ही आता केंद्र सरकारची मदत घेऊ शकता. केंद्र सरकार पीएम मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही हमीशिवाय कर्ज देत आहे.

तुम्ही आता सरकारी मदत घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. सध्या असे व्यवसाय आहेत जे तुम्हाला कमी खर्चात आणि घरी बसून सुरु करता येतात. त्यापैकी एक व्यवसाय मुरमुरा म्हणजेच लाह्या बनवण्याचा व्यवसाय होय.

पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडमध्ये झाल मुर्ही म्हणून मुरमुराला म्हणजेच लाह्यांना जास्त पसंती देतात. विविध पाककृतींसह ते तयार करण्यात येते. मुंबईमध्ये ती भेळपुरी म्हणून खातात तर बंगळुरूमध्ये चुरमुरी म्हणून खातात. इतकेच नाही तर मंदिरात प्रसाद म्हणूनही याचा वापर केला जातो. मुरमुरा म्हणजे लाह्या जे देशातील कानाकोपऱ्यामध्ये खाल्ले जाते. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकजण ते आवडीने खातात. महत्त्वाचे म्हणजे त्याचा वापर स्ट्रीट फूड म्हणूनही करण्यात येतो.

किती येईल खर्च?

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाकडून ग्रामोद्योग रोजगार योजनेंतर्गत मुरमुरा उत्पादन युनिट स्थापन करण्याबाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार या व्यवसायासाठी एकूण 3.55 लाख रुपये इतका खर्च येणार आहेत. समजा तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण आता तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेता येऊ शकते.

अन्न परवाना गरजेचा

पफ करण्यात आलेले तांदूळ बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य कच्चा माल म्हणजेच भात किंवा तांदूळ. जे तुम्हाला तुमच्या जवळच्या बाजारातून घाऊक दराने खरेदी करता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यापूर्वी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडून फूड परवाना घ्यावा लागणार आहे.

कमाई

कमाईचा विचार केला तर सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की लाह्या बनवण्यासाठी एकूण 10 ते 20 रुपये प्रतिकिलो खर्च येतो. तर किरकोळ दुकानदार 40 ते 45 रुपयांना त्याची विक्री करतात. आनंदाची बाब म्हणजे या व्यवसायातून तुम्ही घरी बसून लाखो रुपयांची कमाई करता येते.