Small Business Ideas : कमी पैशात सुरू करा 12 महिने मागणी असणारा व्यवसाय! दरमहा कराल मोठी कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Small Business Ideas : अलीकडच्या काळात तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात व्यवसायाकडे वळू लागला आहे. विशेष म्हणजे अनेकजण तर लाखो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय करत आहेत. आता तुम्हीही तुमचा एक व्यवसाय सुरु करू शकता. समजा तुम्हाला व्यवसाय सुरु करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर काळजी करू नका.

तुम्ही सरकारी मदत घेऊन तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यवसायात जास्त पैशांची गुंतवणूक करावी लागते असे नाही. काही व्यवसाय असे आहेत जे तुम्हाला कमी गुंतवणुकीत करता येतात आणि त्यातून चांगली कमाई करता येते.

सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कालांतराने खराब होतात. त्यांची दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला लॅपटॉप आणि मोबाईल दुरुस्ती केंद्रात जावे लागते. परंतु त्याचे निराकरण करण्यासाठी कुशल कामगारांची गरज पडणार आहे. अशा परिस्थितीत आता तुम्हाला मोबाईल लॅपटॉप दुरुस्ती केंद्र उघडून चांगली कमाई करता येईल.

गरजेचे आहे प्रशिक्षण

जर तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुमच्याकडे असावी. आनंदाची बाब म्हणजे आता तुम्हाला लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंगचे ऑनलाइन प्रशिक्षणही घेता येईल. परंतु यासाठी एखाद्या संस्थेत जाणे खूप फायदेशीर ठरेल. इतकंच नाही तर हा कोर्स केल्यानंतर, जर तुम्ही काही काळ दुरुस्ती केंद्रावर काम केले तर ते तुमच्यासाठी खूप फायद्याचे होईल.

कायम लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

कोणीही सहज पोहोचू शकतील अशा ठिकाणी तुमचे लॅपटॉप दुरुस्ती केंद्र चालू करा. तुमचा व्यवसाय सर्वांना माहित होण्यासाठी तुम्ही सोशल मीडियाची मदत घेऊ शकता. त्यामुळे तुमचा व्यवसाय खूप वेगाने वाढण्यास मदत होईल.

त्याशिवाय लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंग सेंटर चालू केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला खूप जास्त साहित्य ठेवण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला केवळ काही महत्त्वाच्या हार्डवेअर तुमच्यासोबत ठेवावे लागणार आहेत. यामागचे कारण म्हणजे ते लगेच ऑर्डर करता येते.

जाणून घ्या खर्च आणि कमाई

आता तुम्हाला लॅपटॉप आणि मोबाईल रिपेअरिंग सेंटरचा व्यवसाय खूप कमी पैशांमध्ये सुरू करू शकता. सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही 30-50 हजार रुपयांची गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर तुमचा हा व्यवसाय जसजसा वाढत जाईल तसतसे तुम्हाला त्यात गुंतवणूक करता येईल.

सध्याच्या काळात मोबाईल आणि लॅपटॉप रिपेअरिंगचे शुल्क खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायातून चांगली कमाई करता येईल. समजा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एखाद्या कंपनीशी टायअप करूनही चांगले पैसे कमवू शकता.