आर्थिक

पैसे कमावण्याची चिंता सोडा हो ! ‘या’ सरकारी योजनांमध्ये छोटीशी बचत करा आणि लाखोत परतावा मिळवा

Published by
Ratnakar Ashok Patil

Small Investment Scheme:- गेल्या काही वर्षांपासून पोस्ट ऑफिसच्या ज्या काही लहान बचत योजना आणि मुदत ठेव योजना आहेत त्यांना गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदार अतिशय पसंती देताना दिसून येत असून पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे.

पोस्ट ऑफिसच्या अनेक प्रकारच्या योजना असून अगदी लहान मुलांपासून तर महिलांपर्यंतच्या योजना या विशेष आकर्षक ठरलेले आहेत. विशेष म्हणजे पोस्टाच्या बऱ्याच योजनांमध्ये तुम्ही अगदी कमीत रकमेची गुंतवणूक करून देखील चांगला परतावा मिळू शकतात व त्याकरिता पोस्टाच्या अनेक योजना बऱ्याच प्रमाणात फोकस मध्ये असल्याचे दिसते.

तुम्हाला देखील कमीत कमी गुंतवणूक करायचे असेल व चांगला परतावा मिळवायचा असेल तर आपण तीन सरकारी योजना बघणार आहोत. त्याचा लाभ तुम्ही पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील घेऊ शकतात व या योजना तुम्हाला गुंतवणुकीसाठी आणि पैसा कमावण्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात.

या सरकारी योजना गुंतवणुकीसाठी ठरतील फायद्याच्या 

 

1- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना- आपल्याला माहित आहे की, जर खाजगी विमा कंपन्यांकडून जर विमा खरेदी केला तर त्याचा प्रीमियम भरणे सर्वसामान्य नागरिकांना खूप जिकिरीचे होऊन बसते किंवा आर्थिकदृष्ट्या ते परवडत नाही.

अशा लोकांसाठी 2015 मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अतिशय महत्त्वाची योजना असून या योजनेत केवळ 20 रुपयांचा वार्षिक प्रीमियम भरून दोन लाख रुपयांपर्यंतचे अपघात विमा संरक्षण मिळवता येणे शक्य आहे.

त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. या योजनेमध्ये जर बघितले तर पॉलिसीधारकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्या वारशाला म्हणजेच नॉमिनीला विम्याची रक्कम मिळते व अपघातामुळे जर पॉलिसीधारकाला अपंगत्व आल्यास नियमानुसार एक लाख रुपये या माध्यमातून मिळतात.

ही योजना 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाचे वय 70 किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यावर ही योजना संपुष्टात येते.

2- अटल पेन्शन योजना- निवृत्तीनंतर जर तुम्हाला स्थिर उत्पन्न हवे असेल तर तुमच्याकरिता अटल पेन्शन योजना ही खूप महत्त्वाची योजना ठरू शकते. ही सरकारी योजना असून या योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयापर्यंत पेन्शन मिळवता येणे शक्य आहे.

अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून मिळणारी पेन्शन ही तुम्ही किती रक्कम गुंतवत आहात यावर अवलंबून आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतो.

3- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना- ही योजना अतिशय महत्त्वाची असून ही एक टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे. या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूपश्चात कुटुंबाला आर्थिक मदत या माध्यमातून मिळते.

साधारणपणे ही योजना पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम देते. त्यामुळे या रकमेचा फायदा नक्कीच कठीण कालावधीमध्ये त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होतो.

Ratnakar Ashok Patil