आर्थिक

Solar Panel: स्वस्तात बसवा UTL चा 1 Kw चा सोलर पॅनल आणि विजबिलापासून मिळवा मुक्तता! मिळेल सरकारी अनुदान

Published by
Ajay Patil

Solar Panel:- सध्या सौर ऊर्जेच्या वापराला सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येत असून अनेक योजनांच्या माध्यमातून सौर पॅनल बसवल्यानंतर त्यावर अनुदान देखील दिले जात आहे. सरकारी अनुदानाचा लाभ घेऊन घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्हाला प्रत्येक महिन्याला येणाऱ्या वीज बिलाच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते.

आपल्याला माहित आहे की बाजारामध्ये सोलर पॅनलचे अनेक प्रकार आहेत व त्यामध्ये तुमची विजेची गरज ओळखून सोलर पॅनल खरेदी करणे खूप महत्त्वाचे असते. तसेच अनेक कंपन्यांचे सौर पॅनल देखील बाजारात उपलब्ध आहेत.

त्यातीलच जर यूटीएलचा 1Kw क्षमतेचा सोलर पॅनल पाहिला तर तो विजबिल पासून मुक्तता देईलच परंतु पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने देखील तो महत्त्वाचा आहे. हा पॅनल तुम्ही स्वस्तामध्ये बसवू शकतात व सरकारी अनुदान घेऊन त्याची किंमत आणखी कमीत कमी होते.

 काय आहेत UTL 1Kw च्या सोलर पॅनलची वैशिष्ट्ये?

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे युटीएलचे सौर पॅनल हे उच्च दर्जाचे असतात व ते दीर्घ कालावधीसाठी टिकणारे असतात.

2- जर तुम्ही 1Kw चा युटीएलचा सोलर पॅनल खरेदी केला तर तुम्हाला त्यावर पंचवीस वर्षांची वॉरंटी मिळते.

3- तसेच या पॅनल्सला खूप कमी देखभाल म्हणजेच मेंटेनन्स खर्च लागतो. जवळपास या कंपनीचे सोलर पॅनल हे मेंटेनन्स फ्री म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे मेंटेनन्स वरचा तुमचा खर्च वाचतो.

 किती आहे युटीएलच्या 1Kw सोलर पॅनलची किंमत?

युटीएलच्या 1Kw च्या सोलर पॅनलची किंमत साधारणपणे 50 ते 60 हजारापर्यंत असते. परंतु सरकारी अनुदानाचा लाभ घेऊन हा खर्च आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येतो. समजा पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यावर 60 टक्के अनुदान देते

व राज्य सरकार सौर पॅनलच्या स्थापनेवर 15 ते 30 टक्के वेगळे अनुदान देखील देतात. या परिस्थितीमध्ये 70 ते 75% पर्यंत अनुदानाचा लाभ घेऊन तुम्ही 25% स्वतःचा खर्च करून हे सोलर पॅनल बसवू शकतात.

 कसा घ्याल अनुदानाचा लाभ?

यामध्ये केंद्र सरकार सौर पॅनल बसल्यावर साधारणपणे 60% पर्यंत सबसिडी देते व काही राज्यांमध्ये हा दर जास्त आहे. या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो व ही प्रक्रिया अतिशय सोपी असते. याकरिता तुम्हाला केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो.

अर्ज केल्यानंतर तेथून व्यवहार्यता मान्यता मिळते व तुमच्या घराचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर शासनमान्यता प्राप्त विक्रेते तुमच्या घरी सौर पॅनल बसवतात व यावरची सबसिडी 30 दिवसांच्या आत तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते.

 कुठे खरेदी कराल UTL चा 1Kw चा सोलर पॅनल?

तुम्हाला या सौर पॅनलसह सबसिडी हवी असेल तर तुम्ही पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात व त्यानंतर सरकारी मान्यता प्राप्त विक्रेते तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवतात. या व्यतिरिक्त तुम्हाला जर सबसिडीचा लाभ घ्यायचा नसेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून यूटीएल सोलर पॅनल मिळवू शकतात.

तसेच यूटीएलच्या अधिकृत संकेतस्थळावरून देखील तुम्ही हा सोलर पॅनल खरेदी करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या UTL च्या डीलरशी संपर्क साधू शकतात. विशेष म्हणजे हे सोलर पॅनल ॲमेझॉन तसेच फ्लिपकार्ट सारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेत.

Ajay Patil