HDFC Scheme : एचडीएफसी बँकेची खास योजना, फक्त व्याजातूनच कराल बक्कळ कमाई!

HDFC Scheme

HDFC Scheme : मुदत ठेव ही ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित आणि सोपी गुंतवणूक मानली जाते. देशातील बँकाही ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मुदत ठेव योजना आखतात, ज्यावर त्यांना वेगळा अतिरिक्त व्याजदर मिळतो. एचडीएफसी बँक देखील अशीच एक योजना चालवते. या योजनेचे नाव सीनियर सिटीझन केअर एफडी असे आहे. चांगली बातमी अशी आहे की बँकेने या विशेष मुदत ठेव योजनेतील गुंतवणूकीची तारीख वाढवली आहे.

एचडीएफसी बँकेने त्यांच्या विशेष योजनेतील एचडीएफची अंतिम तारीख 2 मे 2024 पर्यंत वाढवली आहे. अशातच आता तुमच्याकडे येथे गुंतवणूक करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. जर तुम्हाला या योजनेतून अतिरिक्त व्याजाचा लाभ घ्यायचा असेल तर अंतिम तारखेपूर्वी यात गुंतवणूक करा.

ही मुदत ठेव योजना 7.75 टक्के पर्यंत व्याज देते. बँकेच्या नियमित एफडी दरापेक्षा या विशेष एफडीवर अतिरिक्त 0.75 टक्के जास्त व्याज दिले जातात, गुंतवणूकदारांना हे अतिरिक्त व्याज फक्त 2 मे पर्यंत मिळणार आहेत. ही योजना 5 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर लागू होईल.

जर तुम्ही या योजनेत 23 एप्रिल 2024 रोजी 5 वर्षे आणि 1 दिवसाच्या कालावधीसाठी 5 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 24 मार्च 2029 पर्यंत 1,84,346 रुपये व्याज म्हणून मिळतील. म्हणजे तुम्हाला एकूण 6,84,346 रुपयांचा परतावा मिळेल. आणि जर तुम्ही तुम्ही 5 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 24 मार्च 2029 पर्यंत फक्त 18,43,471 रुपये व्याजातून मिळतील, म्हणजेच तुम्हाला 5,18,43,471 रुपयांचा परतावा मिळेल.

ज्येष्ठ नागरिक या योजनेत किमान 5,000 रुपये आणि कमाल 5 कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत किमान 5 वर्षे 1 दिवस आणि कमाल 10 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. या विशेष एफडी योजनेत, 5 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर आणि 5 वर्षे आणि 1 दिवसांपेक्षा जास्त ठेवींवर त्रैमासिक आणि मासिक व्याज दिले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe