आर्थिक

एकदा पैसे टाकून ‘हा’ व्यवसाय सुरू करा! आयुष्यभर वर्षाला कमवाल 5 ते 10 लाख; जाणून घ्या माहिती

Published by
Ajay Patil

Profitable Business Idea:- अनेक जण आता व्यवसायांकडे वळत असून नोकऱ्या नसल्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण-तरुणी देखील आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचे आपल्याला दिसते. परंतु व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे त्याकरता देखील आपल्याला पैसा लागतोच.

त्यामुळे व्यवसाय निवडताना बरेच जण आपला आर्थिक बजेट आणि त्या व्यवसायाला असलेली मागणी या दृष्टिकोनातून विचार करून व्यवसायाची निवड करत असतात. तसेच सरकारच्या माध्यमातून देखील लघु उद्योग सुरू करण्यासाठी बऱ्याच प्रकारची मदत आता केली जाते व याकरिता अनेक योजना देखील सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

त्या अनुषंगाने तुम्हाला देखील जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अशा योजनांची मदत घेऊन व्यवसाय सुरू करू शकतात. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण असाच एक व्यवसाय बघणार आहोत जो तुम्हाला एकदा गुंतवणूक केल्यानंतर आयुष्यभर चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न देईल.

हा व्यवसाय म्हणजे पेपर नॅपकिन्स उत्पादन युनिट होय. आपल्याला माहित आहे की आजकाल पेपर नॅपकिनचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो व या अनुषंगाने बाजारात देखील याला खूप मागणी असते. त्यामुळे या संधीचे सोने करून हा व्यवसाय सुरू करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

पेपर नॅपकिन्स उत्पादन युनिट व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?
जर आपण या व्यवसायाविषयी विविध ठिकाणाची माहिती जर बघितली तर साधारणपणे हा व्यवसाय सुरू करण्याकरिता काही मशिनरीची आवश्यकता असते.

पेपर नॅपकिन्स बनवणारी यंत्रे पाच लाख रुपयांपर्यंत मिळतात.जर तुम्ही सेमी ऑटोमॅटिक मशीन खरेदी करायचे ठरवले तर तीही तुम्हाला खरेदी करता येऊ शकते व त्याची किंमत साधारणपणे पाच ते सहा लाख रुपये पर्यंत जाते.

चार ते पाच इंच नॅपकिन पेपर बनवण्याची क्षमता या मशीनची असते व दर तासाला ते शंभर ते पाचशे नग पेपर नॅपकिनचे उत्पादन करू शकते.

अशाप्रकारे तुम्हाला जर मोठ्या स्वरूपामध्ये हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर दहा ते अकरा लाख रुपये तुम्हाला भांडवल यामध्ये गुंतवावे लागते व या प्रकारच्या उत्पादन युनिटची उत्पादन क्षमता तासाला पंचवीसशे पेपर नॅपकिन्स रोल इतकी आहे.

छोटासा प्लांट लावून देखील करता येते सुरुवात
समजा तुमच्याकडे बजेट कमी असेल व तुम्हाला छोट्या स्वरूपामध्ये हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो देखील तुम्हाला सुरू करता येतो. तुम्ही जर या व्यवसायाचा छोटासा प्लांट उभा केला तर वार्षिक तुम्ही दीड लाख किलो पेपर नॅपकिन सहजपणे तयार करू शकतात व वर्षाला दहा लाखापर्यंत उलाढाल आरामात करू शकतात. तुम्ही खर्च वजा करता वर्षाला लाखोंची बचत या माध्यमातून करू शकतात.

या व्यवसायासाठी कर्ज मिळते का?
जर हा व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे जर साडेतीन लाख रुपये भांडवल असेल तर तुम्ही बाकीचे पैसे सरकारकडून कर्ज स्वरूपात मिळवू शकतात व याकरिता तुम्हाला सरकारची मुद्रा योजना मदत करू शकते.

तुम्ही पैसे उभे केल्यानंतर तुम्हाला मुद्रा योजनेत कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करावा लागेल व हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तीन लाख दहा हजार रुपयांचे मुदत कर्ज आणि पाच लाख तीस हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्ज मिळणे शक्य आहे.

अशा पद्धतीने तुम्ही जर चांगला प्रकल्प अहवाल तयार करून व्यवस्थितपणे बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला कर्ज मिळून हा व्यवसाय तुम्हाला सहजपणे सुरू करता येऊ शकतो.

Ajay Patil