आर्थिक

दिवाळीत सुरू करा कमी भांडवलात भरपूर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय! आयुष्यभर कमाई मात्र कराल लाखात

Published by
Ajay Patil

Business Idea:- तुम्हाला देखील एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल व कमीत कमी गुंतवणूक करण्याचा तुमचा प्लॅनिंग असेल तर असे अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत की ते कमी गुंतवणुकीत सुरू करता येतात व माध्यमातून मिळणाऱ्या नफा मात्र प्रचंड असतो.

व्यवसाय करायचा असेल तर तो सुरुवातीला छोट्याशा स्वरूपामध्ये करणे खूप फायद्याचा ठरतो.कालांतराने त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करत जाऊन व्यवसायाचा विस्तार व्यक्तीला करता येतो.

जर आपण कमी गुंतवणुकीत सुरू करता येणाऱ्या व्यवसायांची यादी बघितली तर ती खूप मोठी असल्यामुळे यातून कोणत्या व्यवसायाची निवड करावी याबाबतीत मात्र बऱ्याचदा गोंधळ उडतो.

त्यामुळे आपण या लेखात अशाच एका उत्तम अशा व्यवसायाची माहिती बघणार आहोत जो नवीन  व्यवसायाच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना खूप फायद्याचा ठरू शकतो.

 फरसाण बनवण्याचा व्यवसाय देईल तुम्हाला आर्थिक समृद्धी

आता फरसाण म्हणजेच नमकीन म्हटले म्हणजे हा सगळ्याचा आवडता पदार्थ आहे. जवळपास बऱ्याच घरांमध्ये सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळी स्नॅक्स म्हणून फरसाण आवडीने खाल्ले जाते.

त्यामुळे या व्यवसायाला बाजारपेठेत मागणी भरपूर प्रमाणात आहे. हा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर 300 ते 400 चौरस फूट जागा जरी राहिली तरी पुरेशी ठरते. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या घराच्या एखाद्या खोलीमध्ये देखील या व्यवसायाची सुरुवात करू शकतात.

छोट्या स्तरावर सुरुवात करून टप्प्या टप्प्याने हा व्यवसाय वाढवता येतो व त्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवता येतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फुड लायसन्स आणि एफएसएसआयचे रजिस्ट्रेशन आवश्यक असते.

 फरसाण बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री

आपल्याला माहित आहे की, तुम्हाला कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल व त्यामधून उत्पादन घ्यायचे असेल तर अगोदर उत्पादन तयार करण्यासाठी कच्च्या मालाच्या आवश्यकता असते.

अगदी याच पद्धतीने फरसाण बनवण्याच्या व्यवसायामध्ये तुम्हाला शेंगदाणे तसेच विविध प्रकारची मसाले, बेसन तसेच बटाटे, तेल आणि डाळी इत्यादी कच्चामाल लागतो व काही छोटेसे यंत्र तुम्हाला या व्यवसायासाठी लागतात.

 या व्यवसायासाठी लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न

फरसाण बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्यवसाय सुरू करण्याकरिता किमान दोन लाखापर्यंत भांडवलाची आवश्यकता भासते. मोठ्या स्तरावर जर सुरुवात करायची असेल तर सात ते आठ लाख रुपये खर्च यामध्ये अपेक्षित आहे.

परंतु या व्यवसायाच्या माध्यमातून मिळणारा नफा बघितला तर तो 25 ते 30 टक्क्यांपर्यंत मिळतो. समजा तुम्ही जर या व्यवसायात आठ लाख रुपये गुंतवणूक केली व या गुंतवणुकीमागे जर तुम्हाला 30 टक्के नफा मिळत असेल तर एका महिन्यात तुम्ही या व्यवसायातून दोन लाख 40 हजार कृपया पर्यंतचे आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात.

परंतु अगदी सुरुवातीला कुठलाही व्यवसाय वेग पकडत नसतो व त्याकरिता थोडा वेळ लागतो. यासाठी तुमचे मार्केटिंग कौशल्य व मालाचा दर्जा इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.

एकदा का ग्राहकांच्या पसंतीस तुमचे उत्पादन उतरले तर त्या माध्यमातून मागणी वाढते व जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळवणे शक्य होते. तसेच फरसाण बनवण्याच्या व्यवसायामधील जोखीम बघितली तर ती जवळजवळ कुठल्याही प्रकारची जोखीम नाही किंवा खूप कमी आहे.

Ajay Patil