Low Investment Business Idea:- व्यवसाय म्हटले म्हणजे पैसा हा लागतोच. भांडवल असल्याशिवाय व्यवसाय सुरू करता येत नाही हे त्रिकालबाधित सत्य आहे. परंतु कोणत्या प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा आहे यावर पैसे किंवा गुंतवणुकीच्या स्वरूप अवलंबून असते. व्यवसाय सुरू करायचे म्हटले म्हणजे काही लाखो रुपये गुंतवून व्यवसाय सुरू करता येतो.
तर काही व्यवसाय तुम्हाला काही हजार रुपये गुंतवून देखील सुरू करता येतात. फक्त यामध्ये तुम्हाला व्यवसाय कोणता सुरू करायचा आहे आणि व्यवसाय सुरू करताना त्याची मागणी व त्यातून मिळणारा नफा इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही व्यवसायाची निवड करणे फायद्याचे ठरते.
समजा तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये आहात व तुम्ही शेती जर करत आहात. तर शेती सोबत तुम्ही अगदी छोटे-मोठे व्यवसाय सुरू करू शकतात व महिन्याला चांगले पैसे मिळवू शकतात. अशाच प्रकारचा व्यवसायाच्या शोधात जर तुम्ही असेल तर या लेखामध्ये आपण एका कमी गुंतवणुकीतल्या व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो तुम्हाला चांगले पैसे मिळवून देऊ शकतो.
हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा व्यवसाय म्हणजे कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय होय.या व्यवसायामध्ये तुम्ही अनेक प्रकारचे कार्ड पासून तर लग्नपत्रिका व इतर प्रकारचे कार्ड प्रिंट करू शकतात व चांगले पैसे या माध्यमातून मिळवू शकतात.
कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय आहे फायद्याचा
आजकाल आपल्याला माहित आहे की वाढदिवसाची पार्टी असो किंवा लग्न यामध्ये कार्ड छापले जातात व इतकेच नाहीतर निवृत्तीचा कार्यक्रम असेल किंवा इतर काही कार्यक्रम असतील तरी देखील कार्ड छापण्याचा ट्रेंड सध्या दिसून येतो. प्रिंटिंग व्यवसायाचा योग्य विचार करून जर तुम्ही नियोजन केले तर या व्यवसायाची व्याप्ती खूप मोठी आहे व त्यामुळे चांगल्या संधी या व्यवसायात आहेत.
कार्ड सुंदर आणि आकर्षक बनावे याकरिता उत्तम डिझाईनची गरज असते. तसे पाहायला गेले तर प्रत्येक जण कार्ड प्रिंट करू शकतो. परंतु आकर्षक व चांगले डिझाईन प्रत्येकाला जमेल असे नाही.
इंटरनेटवर बघितले तर कार्डच्या अनेक डिझाइन्स आपल्याला उपलब्ध होतात. परंतु तुम्हाला जर प्रिंटिंग व्यवसाय मध्ये उतरायचे आहे तर तुमच्या स्वतःच्या काहीतरी वेगळ्या आयडिया यामध्ये असणे गरजेचे आहे.
कारण कार्डच्या डिझाईन वेगवेगळ्या कार्यक्रमानुसार बदलणे खूप गरजेचे असते व त्यामुळे अशा बदलांच्या बाबतीत तुम्हाला कायम अपडेट राहणे देखील तितकच गरजेचे असते.
तसेच वेगवेगळ्या डिझाईन शिकणे, काही नवीन ट्रेंड आले तर ते ट्रेंड स्वीकारणे व त्यानुसार डिझाईन करणे व त्या डिझाईन कार्डवर छापणे इत्यादी कौशल्य तुमच्यात असणे आवश्यक आहे.
किती लागते गुंतवणूक व किती मिळतो नफा?
कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करता येणे शक्य आहे. त्यामध्ये जर तुम्हाला एक कार्ड तयार करायचे असेल तर साधारणपणे त्याची किंमत दहा रुपया पर्यंत जाते. परंतु कार्ड कशा दर्जाचे आहे व त्यावरील डिझाईन कशी आहे यावर देखील त्याची किंमत वाढते.
आपल्याला माहित आहे की लग्न पत्रिका या कमीत कमी 200 ते 100 पर्यंतच्या देखील छापले जातात.एखादे कार्ड दहा रुपयांमध्ये छापत असाल तर त्याची संपूर्ण किंमत मोजून तुम्ही तीन ते पाच रुपयांची बचत एका कार्ड मागे करू शकतात व कार्ड जर महाग असेल तर दहा ते पंधरा रुपयांचा मार्जिन तुम्हाला एका कार्ड मागे होऊ शकतो.
अशाप्रकारे अगदी तुम्ही तुमची नोकरी किंवा शेती सारखा व्यवसाय करत असाल तरी देखील कार्ड प्रिंटिंगचा व्यवसाय तुम्ही करू शकतात व अतिरिक्त कमाई या माध्यमातून तुम्हाला करता येऊ शकते.