आर्थिक

1 वर्ष कालावधीकरिता करा ‘या’ 5 स्टॉकची खरेदी अन मिळवा 60 टक्क्यांपर्यंत परतावा! जाणून घ्या यादी

Published by
Ratnakar Ashok Patil

Stock For Long Term Investment:- सध्या शेअर बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाण आपल्याला वाढतांना दिसून येत आहे व यामध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन कालावधीसाठी गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात. बरेच गुंतवणूकदार हे दीर्घकालीन कालावधीसाठी अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात.

त्यामुळे तुम्हाला देखील बारा महिने म्हणजेच एक वर्षाच्या कालावधीसाठी शेअर खरेदी करायचे असतील तर मिराई असेट शेअरखान(Mirae Asset Sharekhan) यांनी गुंतवणूकदारांसाठी पाच शेअरची म्हणजेच स्टॉकची निवड केलेली आहे. त्यांच्याकरिता कोणते टार्गेट देण्यात आले आहे? त्याबद्दलची आपण माहिती थोडक्यात बघू.

दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक वर्ष कालावधीसाठी फायद्याचे ठरतील हे पाच स्टॉक

1- हिंदुस्तान एरोनॉटिक्स- सध्या जर आपण हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अर्थात एचएएलच्या आजच्या शेअरची किंमत बघितली तर ती 4120 रुपये आहे व याकरिता 5485 रुपयांचे उद्दिष्ट म्हणजेच टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. या कंपनीच्या शेअरचा जर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी बघितली तर ती 5675 रुपये आणि नीचांकी पातळी ही 2817 रुपये इतकी आहे.

2- पॉलीकॅब इंडिया- सध्या पॉलीकॅब इंडियाचा हिस्सा म्हणजे शेअरची किंमत 6780 रुपये आहे व याकरिता 8300 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आलेली आहे.पॉलीकॅब इंडिया इलेक्ट्रिकल केबल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असून या कंपनीच्या स्टॉकची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी 7607 रुपये आणि निचांकी पातळी 4100 रुपये इतकी आहे.

3- झायडस वेलनेस- सध्या झायडस वेलनेसच्या शेअरची किंमत 1876 रुपये आहे व यासाठी तीन हजार रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. ते सध्याच्या किमतीच्या 60 टक्के असून या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2484 रुपये आणि नीचांकी पातळी 1441 रुपये आहे.

4- एसबीआय- सध्या एसबीआयचा शेअर 764 रुपयांवर असून यासाठी 1050 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे व ते सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 37% आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 912 रुपये व 52 आठवड्यांचा निचांक 600 रुपये इतका आहे.

5-Protean eGOV- या शेअरची सध्याची किंमत सध्या 1714 आहे व यासाठी 2510 रुपयांची टार्गेट प्राईस देण्यात आली आहे. या स्टॉकसाठी 52 आठवड्यांचा उच्चांक 2225 आणि 52 आठवड्यांचा निच्चांक 930 रुपये आहे.

Ratnakar Ashok Patil