Public Provident Fund : PPF अकाउंट बंद झालंय तर नो टेंशन! पुन्हा सक्रिय करण्यासाठी करा ‘हे’ काम !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Public Provident Fund : सरकारकडून PPF योजना चालवली जाते. (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी) ज्या अंतर्गत कर्मचारी दर महिन्याला त्यांच्या पगाराचा काही भाग या निधीत जमा करतात. या योजनेत सरकार गुंतवणुकीच्या रकमेवर व्याजाचा लाभ देते. तसेच येथे चक्रवाढ व्याजाचा देखील लाभ मिळतो.

याशिवाय या योजनेत आयकर कायदा 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ दिला जातो. या योजनेद्वारे कर्मचारी 15 वर्षांत चांगली रक्कम गुंतवू शकतात. सेवानिवृत्तीनंतर उत्पन्न चालू ठेवण्यासाठी हा निधी खूप उपयुक्त आहे. या फंडात किमान 500 आणि 1.5 लाख पर्यंत गुंतवणूक करता येते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने संपूर्ण आर्थिक वर्षासाठी या फंडात कोणतेही योगदान दिले नाही तर त्याचे खाते निष्क्रिय होते. पीएफ फंड सक्रिय करण्यासाठी, गुंतवणूकदाराला एका वर्षात किमान 500 रुपये योगदान द्यावे लागते.

जर तुमचेही पीएफ खाते निष्क्रिय झाले तर तुम्ही ते पुन्हा सुरु करू शकता. चला, जाणून घेऊया त्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे?

पीएफ खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी काय करावे?

-खाते पुन्हा उघडण्यासाठी तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.

-आता तुम्हाला खाते सक्रिय करण्यासाठी लेखी अर्ज द्यावा लागेल.

-याशिवाय, तुम्हाला प्रति वर्ष किमान रकमेसह 50 रुपये डिफॉल्ट शुल्क जमा करावे लागेल.

-उदाहरणार्थ, जर पीएफ खाते 3 वर्षांपासून बंद असेल, तर तुम्हाला किमान 1,500 रुपये आणि 150 रुपये दंड भरावा लागेल. यानंतर तुमचे खाते पुन्हा सुरु होईल.

पीपीएफचे फायदे :-

-कोणताही भारतीय रहिवासी या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

-यामध्ये गुंतवणूकदाराला लवचिकतेचा लाभ मिळतो.

-पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्ही 25 टक्के कर्ज घेऊ शकता.

-पीपीएफ फंडातील कर सवलतींचा लाभ गुंतवणूकदारांना मिळतो.

-पीपीएफ निधी थेट सरकारद्वारे व्यवस्थापित केला जातो.