आर्थिक

लाखो रुपयांची पगाराची नोकरी सोडली व सुरू केल शेतकऱ्यांसाठी काम ! कमाई 1250 कोटी…

Published by
Ajay Patil

Success Story:- जीवनामध्ये काही व्यक्ती खूप वेगळ्या पद्धतीने जीवन जगत असतात. म्हणजे अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्याला बऱ्याच व्यक्तीची मानसिकता ही एक चौकटीमध्ये असलेली दिसून येते.

चौकट म्हणजे तरुणांच्या दृष्टिकोनातून बघितले तर उच्च शिक्षण घ्यायचे व त्या शिक्षणाच्या अनुषंगाने चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली की आयुष्यभर त्यामध्ये समाधानी राहून काम करत राहायचे या पद्धतीची एक पद्धत किंवा मानसिकता आपल्याला दिसून येते.

परंतु समाजामध्ये आपल्याला अशा अनेक व्यक्ती दिसतात की ते ही चौकट सोडून काहीशा अस्थिर अशा क्षेत्रांमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतात व अखंड परिश्रम घेऊन यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश देखील मिळवतात.

काही तरुणांनी तर अशा कामांसाठी लाखो रुपये पॅकेजच्या नोकऱ्या सोडल्या आणि अवघड अशा व्यवसायांमध्ये ते यशस्वी झाले. अगदी याच पद्धतीचे उदाहरण किंवा यशोगाथा आपल्याला शशांक कुमार या तरुणाची घेता येईल.

 शशांक कुमारने लाखो रुपयांची पगाराची नोकरी सोडली सुरू केली शेतकऱ्यांसाठी काम

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शशांक कुमार हा मूळचा छपरा बिहारचा रहिवासी असून त्याची आई शिक्षिका तर वडील हे राष्ट्रीय विद्युत मंडळामध्ये नोकरीला होते.

अशा प्रकारच्या कौटुंबिक वातावरणात वाढत असताना शशांक कुमारचे शिक्षण झारखंड मधील नेतरहाट या ठिकाणी झाले व त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली या ठिकाणहून टेक्स्टाईल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.

त्यानंतर पुढील शिक्षण हे आयआयटी दिल्लीच्या मॅनेजमेंट स्टडीज विभागामध्ये घेऊन बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन मधून उच्च शिक्षण देखील पूर्ण केले व त्यानंतर जॉब म्हणून बिकन ॲडव्हाइसरी सर्व्हिसेस या कंपनीमध्ये अडीच वर्षे काम केले. परंतु कालांतराने शशांकचा एक मित्र मनीष कुमार आयआयटी खरगपुर मध्ये नोकरी करत होता

व त्यांनी नोकरी जेव्हा सोडली तेव्हाच शशांक यांनी सुद्धा नोकरी सोडली व शेती उद्योगांमध्ये काहीतरी काम करण्याच्या उद्देशाने 2011 मध्ये नॉन प्रॉफिट फाउंडेशन फर्म आणि फार्मर्सची स्थापना केली व त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 2012 मध्ये डीहाट(DeHaat) सोशल एंटरप्राइजेस ग्रीन ॲग्रीव्होल्युशन सुरू करून शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली.

या सगळ्या व्यवसायामध्ये शशांक कुमार ला अमरेंद्र सिंग, सुंदर तसेच आदर्श श्रीवास्तव हे देखील कंपनी सांभाळण्यामध्ये मदत करत असून या कंपनीचे सध्या गुरुग्राम आणि पाटणा येथे ऑफिस आहेत. या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या कल्पना आणि योजना देणे हे या कंपनीचे काम आहे.

 कसे आहे शशांक कुमारच्या डीहाट या कंपनीचे स्वरूप?

शशांक कुमार यांचे DeHaat डिजिटल पोर्टल असून जे लहान शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत शेतीमध्ये आवश्यक असलेले विविध उपकरणे पुरवणाऱ्या लहान व्यवसाय मालकांशी कनेक्ट करण्याचे महत्त्वपूर्ण काम करते.

या पुरवठादारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक बियाणे, खते तसेच आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करता येते. तसेच त्यांना विविध पिकांचा सल्ला सेवा आणि बाजार कनेक्शन याबद्दल माहिती या पोर्टलच्या माध्यमातून मिळते.

याबद्दल माहिती देताना शशांक कुमार म्हणतात की,शेतकऱ्यांना कृषी सुधारित विक्री आणि देशांतर्गत व त्यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कृषी उत्पादनांच्या व्यापारामुळे या आर्थिक वर्षात अग्रोटेक कंपनी डीहाटचे उत्पन्न  80% पेक्षा जास्त वाढून ते 2300 कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा असून पीटीआय नुसार 2022 मध्ये डीहाटची एकूण कमाई 1250 कोटी रुपये होती.

Ajay Patil