Suzlon Energy Share Price:- गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी, 18 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये साधारणपणे 0.21% ची वाढ दिसून आली. या वाढीसह हा शेअर 56.99 वर पोहोचला होता.
जर आपण गेल्या काही दिवसांची या कंपनीच्या शेअरची कामगिरी बघितली तर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी ८६.०४ रुपये तर नीचांकी पातळी 35.50 होती.
त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर खरेदी करावा की नाही? याबाबत शेअर मार्केट तज्ञांच्या माध्यमातून देण्यात आलेले संकेत महत्त्वाचे ठरतील.
टेक्निकली सुझलॉन एनर्जी शेअरला किती आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल?
सुझलॉन एनर्जी शेअरला सध्या टेक्निकल सेटअपवर 58 ते 54 रुपयांच्या रेंजमध्ये आधार म्हणजे सपोर्ट मिळू शकतो व सकारात्मक ट्रेंड रिवर्सलसाठी मात्र 65 ते 70 रुपयांच्या झोनच्या पुढे असणे आवश्यक आहे. परंतु एका बाजार विश्लेषकांनी मात्र या शेअरला सध्याच्या पातळीवर खरेदी न करण्याचा सल्ला दिला आहे.
स्टॉक मार्केट तज्ञ ओशो कृष्णांनी काय दिले संकेत?
एंजल वन ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ञ असलेले ओशो कृष्ण यांनी याबाबत म्हटले आहे की, सुझलॉन एनर्जी शेअरने 66 ते 70 रुपयांच्या सबझोन जवळ कन्सोलिडेशनच्या टप्प्यानंतर घसरण सुरू केली आहे.
परंतु या शेअरमध्ये नुकतीच 56 ते 54 रुपयांची जी काही नीचांकी पातळी मिळाली त्यामुळे काहीसा दिलासा मिळेल अशी शक्यता त्यांनी वर्तवली असून या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कारण यापेक्षा जर यामध्ये जास्त घसरण झाली तर शॉर्ट टर्म दृष्टिकोनातून हा फायद्याचा ठरू शकतो. तसेच सुजलॉन एनर्जी शेअरला वरच्या बाजूला 65 ते 70 रुपयांचा वरील झोन भक्कम अडथळा ठरण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
आनंद राठीचे मार्केट तज्ञ जिगर एस. पटेल यांनी काय म्हटले?
प्रसिद्ध आनंद राठी ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्केट तज्ञ जिगर एस पटेल यांनी याबाबत म्हटले की, सुझलॉन एनर्जी शेअरला सपोर्ट 58 रुपये आणि रेजिस्टन्स 62 रुपये असेल
व त्यासोबत या शेअरने 62 रुपयांच्या वर तेजी दाखवली तर पुढे 65 रुपयांच्या वर तेजी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर या शेअरची अपेक्षित शॉर्ट टर्म ट्रेडिंग रेंज 57 ते 65 रुपयांच्या दरम्यान असेल असे देखील तज्ञांनी म्हटले आहे.
उच्च जोखीम घेण्याची क्षमता असलेले गुंतवणूकदार करू शकतात या शेअरची खरेदी
ज्या गुंतवणूकदारांमध्ये उच्च जोखीम घेण्याची क्षमता आहे असे गुंतवणूकदार सुझलॉन एनर्जी शेअर खरेदी करू शकतात असे वेल्थमिल्स सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मचे इक्विटी स्ट्रॅटेजी तज्ञ क्रांती बथिनी यांनी म्हटले आहे.
कारण सध्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रामध्ये तेजी असल्यामुळे सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरला घसरला तर गुंतवणूकदार अधिक शेअर्स खरेदी करू शकतात असं देखील विश्लेषकांनी म्हटले आहे.