Systematic Investment Plan : जर तुम्ही कार्यरत व्यावसायिक असाल तर तुम्हाला आतापासूनच तुमच्या सेवानिवृत्ती योजनेची तयारी करावी लागेल. पण बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठा फंड तयार करू शकत नाही. जर तुम्हाला मोठा फंड तयार करायचा असेल तर तुम्ही थोडीशी रिस्क घेतली पाहिजे.
तुम्ही म्युच्युअल फंडाद्वारे भविष्यात मोठा फंड गोळा करू शकता. इथला पैसे वेगाने वाढतो. म्युच्युअल फंडाची SIP हे देखील असेच एक साधन आहे. ज्यामध्ये तुम्ही लाँग टर्ममध्ये 10 पट पर्यंत कमाई करू शकता. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
पण जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर बँक आणि पोस्ट ऑफिसयामधील गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. परंतु या गुंतवणुकांमधून तुम्हाला हवा ठेवढा परतावा मिळत नाही. अशा परिस्थितीत, SIP मधील गुंतवणूक तुमच्या फायद्याची असेल. SIP मधील गुंतवणूक कशी फायद्याची ठरेल जाणून घेऊया…
समजा आता तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली. जर तुम्ही 25 वर्षे दरमहा 6000 रुपये गुंतवत असाल. आणि जर सरासरी परतावा 12 टक्के असेल तर वयाच्या 45 व्या वर्षी तुम्ही 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीगोळा कराल. SIP कॅल्क्युलेटरनुसार, सरासरी 12 टक्के रिटर्नवर, तुम्हाला 25 वर्षांत एकूण 11385811 रुपये मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक 18 लाख रुपये असेल. यामध्ये व्याजातून 9585811 रुपये मिळतील.
30 वर्षांत किती होईल फायदा !
तुम्ही यात सतत 30 वर्षे गुंतवणूक केल्यास एकूण गुंतवणूक 21,60,000 रुपये होईल. वयाच्या 50 व्या वर्षी तुमच्याकडे 2,11,79,483 रुपये असतील. तुम्हाला फक्त व्याजातून 1,90,19,483 रुपये मिळतील.
500 रुपयांपासूनही गुंतवणूक करू शकता
एसआयपीद्वारे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यातून मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही 500 रुपये देऊनही एसआयपी सुरू करू शकता. बहुतेक तज्ञांचा असा विश्वास आहे की SIP द्वारे कमी वेळेत जास्त पैसे कमावता येतात. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइल पाहूनच निर्णय घ्यावा.