आर्थिक

एचडीएफसी बँकेकडून 7 वर्षांकरिता 8 लाखाचे पर्सनल लोन घ्या आणि तुमच्या आर्थिक गरज भागवा! वाचा किती भरावा लागेल ईएमआय?

Published by
Ajay Patil

HDFC Bank Personal Loan:- आयुष्यामध्ये अचानकपणे एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते व त्यावेळी आवश्यक असलेला पैसा आपल्याकडे असतो असे होत नाही.त्यामुळे अशा प्रसंगी मित्र किंवा नातेवाईकांची मदत घेतली जाते किंवा दुसरा पर्याय हा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेण्याचा असतो.

बँकेच्या माध्यमातून प्रॉपर्टी लोन, गोल्ड लोन आणि वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन इत्यादी पर्याय वापरले जातात व या माध्यमातून कर्ज घेऊन पैशांची गरज पूर्ण केली जाते.

या कर्ज प्रकारामध्ये जर प्रॉपर्टी आणि गोल्ड लोनचा विचार केला तर ही सुरक्षित प्रकारातील कर्ज आहेत व त्या तुलनेत मात्र पर्सनल लोन हे असुरक्षित प्रकारातील कर्ज असल्यामुळे याकरिता इतर कर्जांच्या मानाने जास्त व्याजदर द्यावा लागतो.

परंतु असे असताना देखील बरेच जण पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य देतात. प्रत्येक बँकेकडून तुम्हाला पर्सनल लोन दिले जाते व प्रत्येक बँकेचे व्याजदर देखील याकरिता वेगवेगळे आहेत.

या अनुषंगाने तुम्हाला देखील जर एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर या बँकेकडून तुम्ही आठ लाख रुपयांचे पर्सनल लोन सात वर्षे कालावधीकरिता घेतले तर तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल? हे देखील माहित असणे तितकेच गरजेचे आहे.

एचडीएफसी बँकेकडून तुम्ही सात वर्षांकरिता आठ लाखाचे पर्सनल लोन घेतले तर किती भरावा लागेल हप्ता?
एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असून या बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर ते साधारणपणे वार्षिक 10.85% ते 24 टक्के इतक्या व्याजदराने देते. हा व्याजदर प्रामुख्याने कर्जदाराचे वय तसेच त्याचे उत्पन्नाचे स्त्रोत, क्रेडिट स्कोर आणि कर्जाचा कालावधी इत्यादीवर अवलंबून असतो.

यासाठी प्रक्रिया शुल्क हे पर्सनल लोन वर अवलंबून असून त्यासोबत तुम्हाला जीएसटी देखील भरावा लागतो. समजा एखाद्या व्यक्तीने जर 10.85% व्याजदराने सात वर्षांकरिता एचडीएफसी बँकेकडून आठ लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले तर प्रत्येक महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.

यामध्ये जर तुम्ही ईएमआय कॅल्क्युलेटर वापरले तर त्यानुसार 10.85% व्याजदराने सात वर्षाच्या कालावधीकरिता आठ लाख रुपयांचे पर्सनल लोन घेतले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 13653 रुपये ईएमआय भरावा लागेल.

या संपूर्ण सात वर्षाच्या कालावधीत तुम्ही व्याजापोटी बँकेला एकूण तीन लाख 45 हजार 335 रुपये भराल व व्याज आणि मुद्दल मिळून तुम्हाला 11 लाख 45 हजार 335 रुपये बँकेला द्यावे लागते.तुम्हाला जर एचडीएफसी बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल तर तुम्ही त्याकरिता तुम्ही ऑनलाइन देखील अर्ज करू शकतात.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे देखील अतिशय सोपे असून या पद्धतीने तुम्ही अर्ज केला तर अर्ज केल्यानंतर तुम्ही कर्जासाठी पात्र आहेत की नाही हे बँक तपासते व तुमच्या अर्जाची छाननी केली जाते व तुम्ही जर पात्र असाल तर काही दिवसात कर्जाची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा केली जाते.

Ajay Patil