Tea Franchise Business:- कमीत कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा कमवायचा असेल तर आजकालच्या दुनिया मध्ये एकच व्यवसाय आहे व तो म्हणजे चहा विक्रीचा व्यवसाय होय. अगदी तुम्ही थोड्याशा गर्दीच्या जागी रस्त्याच्या कडेला एका छोट्याशा गाडीवर जरी हा व्यवसाय सुरू केला तरी तुम्ही दिवसाला पाचशे रुपये नफा कसाही कमवू शकतात एवढी क्षमता या व्यवसायात आहे.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जास्तीत जास्त पाच ते दहा हजार रुपये भांडवलात तुम्ही हा व्यवसाय सुरू करून चांगल्या पद्धतीने मार्जिन या माध्यमातून मिळवू शकता. परंतु याही पुढे जात तुम्हाला जर हा व्यवसाय ब्रँडेड स्वरूपामध्ये सुरू करायचा असेल तर त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचा पर्याय म्हणजे एखाद्या ब्रँडेड चहाची फ्रॅंचाईजी घेणे हा होय.
महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये येवले अमृततुल्य हे नाव चहाच्या बाबतीत खूप प्रसिद्ध असून प्रत्येकाला माहिती असलेल्या नाव आहे.या लेखात आपण येवले अमृततुल्यची फ्रेंचाईजी कशी सुरू करावी? त्याची प्रोसेस कशा पद्धतीची आहे? त्याबद्दलची माहिती बघणार आहोत.
येवले अमृततुल्य चहाची फ्रॅंचाईजी घेण्यासाठी आवश्यक पात्रता
महत्वाचे म्हणजे तुम्हाला देखील अमृततुल्य चहा फ्रेंचायजी घ्यायचे असेल तर त्याकरिता तुमच्याकडे शंभर ते दोनशे पन्नास स्क्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे. कारण या जागेवर तुम्ही येवले अमृततुल्य चहाचे आऊटलेट उभारू शकता.
तसेच यामध्ये तुम्हाला जीएसटी नोंदणी, येवले अमृततुल्य यांच्याकडून एफएसएसएआय मंजुरीची कागदपत्रे, येवले अमृततुल्य कडून ट्रेडमार्कची मान्यता तसेच भाडे करार, पॅन कार्ड आणि आधार कार्ड इत्यादींचा तपशील द्यावा लागतो.तसेच येवले अमृततुल्य फ्रेंचायसीचे मालक म्हणून पात्र होण्याकरिता तुमच्याकडे शिक्षण तसेच उद्योजकता कौशल्य इत्यादी गोष्टींना आधार देणारे कागदपत्रे असणे देखील गरजेचे असते.
तसेच ही फ्रॅंचाईजी चांगली चालवण्याकरिता तुम्ही कर्मचाऱ्यांना विक्रीच्या बाबतीत पुरेसे ट्रेनिंग तसे चहा बनवण्याचे ट्रेनिंग देणे देखील गरजेचे आहे.
येवले अमृततुल्य चहा फ्रॅंचाईजी करिता किती करावी लागते गुंतवणूक?
यामध्ये नियमित मॉडेल साठी( मेट्रो शहरात) गुंतवणुक ही 10 लाख 50 हजार रुपये( जीएसटी वगळून) भरावे लागतात व यामध्ये…
फ्रेंचायसी शुल्क एक लाख पन्नास हजार अधिक अठरा टक्के जीएसटी
विपणन शुल्क एक लाख 50 हजार अधिक अठरा टक्के जीएसटी
पायाभूत सुविधा खर्च याकरिता पाच ते सहा लाख रुपये( जीएसटी वगळून)
हा खर्च अंदाजे असून यामध्ये पायाभूत सुविधा तसेच नूतनीकरण आणि स्थान यानुसार बदल देखील होऊ शकतो. येवले चहाच्या फ्रॅंचाईजी मध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये पर्यंतचा नफा देखील कमवू शकता.
येवले अमृततुल्य चहा फ्रॅंचाईजी मिळवण्याची प्रोसेस कशी आहे?
याकरिता तुम्हाला अर्ज करावा लागतो व या चहाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज तुम्हाला करता येतो व अर्ज सादर केल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती देणे गरजेचे असते. तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर येवले अमृततुल्य कडून पुढची प्रक्रिया होण्याकरिता तुम्हाला प्रतीक्षा करावी लागते.
कुठे कराल संपर्क?
कार्यालय क्रमांक 101, पहिला मजला, सिल्वर पॉईंट बिल्डिंग, कात्रज कोंढवा रोड, विश्व जिम जवळ,कात्रज पुणे या पत्त्यावर देखील तुम्ही संपर्क साधू शकता.