Personal Loan:- जीवनामध्ये अचानकपणे कुठल्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती केव्हा उद्भवेल आणि जास्त प्रमाणात पैशांची आवश्यकता केव्हा भासेल याची कुठलीही शाश्वती आपल्याला देता येत नाही.
अशा आर्थिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण बँकांकडे कर्जाची मागणी करतो किंवा कर्जासाठी अर्ज करत असतो. यामध्ये बरेच जण पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करतात. वैयक्तिक कर्ज हे प्रत्येक बँकेकडून देण्यात येते व यामध्ये प्रत्येक बँकांचे वेगवेगळे असे नियम व अटी असतात.
हे नियम व अटी पूर्ण केल्याशिवाय तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकत नाही. तसेच अशा प्रकारच्या वैयक्तिक कर्जाकरिता अर्ज करण्याअगोदर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील गरजेचे असते. त्यामुळे या संबंधीची माहिती आपण या लेखात बघू.
पर्सनल लोनसाठी अर्ज करा परंतु या गोष्टी लक्षात ठेवा
1- निश्चित उत्पन्नाच्या साधनाचा विचार करणे- जेव्हा तुम्ही कुठल्याही वित्तीय संस्थेकडे किंवा बँकेकडे कर्ज घेण्यासाठी अर्ज करतात किंवा कर्जाची मागणी करतात तेव्हा या संस्था किंवा बँक तुमची उत्पन्न पाहत असते. त्यामध्ये तुमचा आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत स्थिर आहे की नाही हे पाहिले जाते.
त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही नोकरी लवकरात लवकर सोडणे टाळावी तसेच स्थिर उत्पन्न मिळवू शकता याची देखील तुम्ही खात्री करणे गरजेचे आहे.
कारण घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुमच्याकडे स्थिर आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असणे तितकेच गरजेचे असते. जर तुमच्याकडे उत्पन्नाचा स्त्रोत किंवा उत्पन्न अस्थिर असेल तर बँक तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही.
2- क्रेडिट स्कोर पाहणे- तसेच तुम्ही कर्जाची मागणी करण्याअगोदर तुमचा क्रेडिट स्कोर तपासून घेणे खूप गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही जर अगोदर कुठले कर्ज घेतले असेल ती वेळेवर भरले असेल तर तुमच्या क्रेडिट स्कोर चांगला असतो.
बँकांकडून तुम्हाला वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर 700 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. परंतु या खाली जर तुमच्या क्रेडिट स्कोर असेल तर कर्ज मिळण्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे कर्जासाठी अर्ज करण्याअगोदर तुमच्या क्रेडिट स्कोर चांगला असणे गरजेचे आहे.
3- खर्चाचे नियोजन करणे- यामध्ये तुमचे उत्पन्न किती आहे आणि तुमचा खर्च किती आहे याचे देखील नियोजन किंवा अंदाज बांधणे गरजेचे आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या वित्तीय संस्थेकडे किंवा बँकेकडे कर्ज मागण्यासाठी अर्ज करतात
तेव्हा तुमचा खर्च आणि आधी काही कर्ज घेतले आहेत का हे देखील या संस्थांकडून पाहिले जाते. एवढेच नाही तर तुमचा महिनाभर खर्च केल्यावर तुमच्याकडे किती उत्पन्न शिल्लक राहते हे देखील बघितले जाते.
या गोष्टी पाहूनच तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थांकडून वैयक्तिक कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे.
4- वेगवेगळ्या बँकांच्या व्याजदराची तुलना- प्रत्येक बँकांचे वैयक्तिक कर्जावरील व्याजदर वेगवेगळे असतात. त्यामुळे कर्जासाठी विचारणा करताना एकाच ठिकाणहून व्याजदर न तपासता त्यामध्ये वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर तपासून त्यांचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे.
तुम्हाला ज्या ठिकाणी परवडेल त्या ठिकाणी तुम्ही मूल्यांकन केल्यानंतर कर्जासाठी अर्ज करावा. कारण व्याजदराचा परिणाम हा तुमच्या कर्ज परतफेड रकमेवर होत असतो. ज्या बँका किंवा वित्तीय संस्थेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळेल त्या ठिकाणी तुम्ही कर्जासाठी अर्ज करावा.