आपण पाहतो की बऱ्याच जणांची वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक स्वरूपात फसवणूक केली जाते व आपल्याला ते कळत देखील नाही. तसे पाहायला गेले तर कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रात फसवणुकीच्या घटना आपल्याला घडताना दिसून येतात. त्यामुळे आपण काही गोष्टींनी सजग राहणे तितकेच गरजेचे आहे.
या आर्थिक दृष्टिकोनातून फसवणुकीच्या घटनांना पेट्रोल पंप देखील अपवाद नसतात. कारण बऱ्याचदा आपण जेव्हा पेट्रोल पंपावर वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरायला जातो तेव्हा अनेक मार्गांनी आपली फसवणूक होऊ शकते.
पेट्रोल पंपावर अनेक पर्यायांचा वापर करून अशी फसवणूक होण्याची दाट शक्यता असते व त्याकरिता तुम्ही जेव्हाही वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरायला पंपावर जाल तेव्हा काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर आपण समोर असताना देखील आपल्याला कळत देखील नाही की आपली फसवणूक होते आहे ते.
‘या’ गोष्टींवर लक्ष द्या आणि पेट्रोल किंवा डिझेल भरताना होणारी फसवणूक टाळा
1- वाहनामध्ये इंधन भरताना मीटरकडे लक्ष ठेवा– हा जो पर्याय आहे हा प्रत्येक जण वापरतो. कारण जेव्हाही आपण पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरतो तेव्हा आपण मीटरवर लक्ष देत असतो. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की तुम्ही जेव्हा पेट्रोल भरता
तेव्हा शंभर रुपये किंवा 200 किंवा 500 किंवा कोणत्याही राऊंड फिगर रकमेऐवजी पाच ते दहा रुपये वाढवून किंवा कमी करून पेट्रोल टाकायला सांगावे. यामागील प्रमुख कारण म्हणजे बऱ्याच पंपावरील मशीन चुकीच्या पद्धतीने सेट केलेल्या असतात किंवा चुकीच्या पद्धतीने लावल्या जातात. यामुळे तुमच्या वाहनात कमी पेट्रोल किंवा डिझेल भरले जाते व फसवणूक होते.
2- इंधनाची डेन्सिटी पहा– इंधनाची डेन्सिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा असून तुम्ही जेव्हाही कार किंवा बाईकमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भराल तेव्हा इंधनाची डेन्सिटी तपासून घ्यावी. तर साधारणपणे पेट्रोल साठी आवश्यक असलेली डेन्सिटी पाहिली तर ती 730 ते 800 किलो प्रति क्युबिक मीटर असणे गरजेचे आहे व त्यासोबत डिझेल साठी ती 830 ते 900 किलो क्युबिक मीटर असावी.
परंतु पेट्रोलची डेन्सिटी 730 युनिट पेक्षा कमी असेल तर त्या पेट्रोलमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. दुसरे म्हणजे डिझेलचे डेन्सिटी 830 पेक्षा कमी असल्याचे दिसून आल्यास त्यामध्ये भेसळ असल्याचे समजा.
3- फ्युएल मीटरवरची किंमत तपासा– आपल्याला माहित आहे की पंपावरील जे काही फ्युएल मीटर असते त्यामध्ये किंमत दाखवली जाते. मीटर मध्ये इंधन भरताना किमतीत तीन ते चार रुपयांची वाढ झालेली दिसेल.
ती एक सामान्य गोष्ट असते.जर तुम्हाला त्या मीटरमध्ये जर दहा किंवा वीस रुपयांची किमतीत वाढ दिसत असेल तर समजा मीटरमध्ये छेडछाड झालेली आहे. अशा प्रसंगी तुम्ही सावध राहणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही सावध राहाल तरच तुमची फसवणूक टळू शकते.