आर्थिक

प्रसूतीसाठीच्या खर्चाचे टेन्शन सोडा! प्रसुतीच्या खर्चामध्ये मातृत्व विमा करेल तुम्हाला मदत,वाचा संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

जीवन जगत असताना अचानकपणे विविध प्रकारचे खर्च उद्भवतात व ते खर्च आवश्यक देखील असतात. यामध्ये जर आपण हॉस्पिटलचा खर्च पकडला तर तो कधीही कुणाला सांगून येत नाही. बऱ्याचदा घरामध्ये अचानक कोणीतरी आजारी पडते व मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलचा खर्च करण्याची वेळ आपल्यावर येते.

यावेळी पैशांची अडचण जर असेल तर खूप समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी आरोग्य विमा आपल्याला फायद्याचा ठरतो. अगदी आरोग्य विषयक समस्यांमध्ये जर आपण प्रसूती म्हणजेच बाळंतपणाचा विचार केला तर हा देखील एक मोठ्या प्रमाणावर उद्भवणारा खर्च आहे व आता सिझरियन प्रसूती मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे बऱ्याचदा बिल 50 हजार ते लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

त्यामुळे बऱ्याचदा या खर्चाचा मोठा आर्थिक ताण व्यक्तीवर येतो. हा ताण कमी व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला या कामी मातृत्व विमा खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो. मातृत्व विम्यामध्ये बाळंतपणाच्या कालावधीतील सर्व खर्च कव्हर केला जातो.

 मातृत्व विम्यामध्ये कोणते फायदे मिळतात?

1- या विम्यामध्ये प्रसुती पूर्व तसेच प्रसूती आणि प्रसूती नंतरच्या कालावधीत जो काही खर्च होतो तो संपूर्णपणे यामध्ये कव्हर होतो.

2- तसेच या मातृत्व विम्यामध्ये प्रसूतीच्या कालावधीत करायचे लसीकरण तसेच इन्फर्टिलिटी याबाबतचे उपचार यांचा देखील संपूर्ण खर्च दिला जातो.

3- काही कंपन्यांचा माध्यमातून जर मातृत्व विमा उतरवला तर त्या अंतर्गत सरोगसी तसेच आयव्हीएफ उपचारांचा खर्च देखील दिला जातो.

 मातृत्व विमा घ्या परंतु या गोष्टींची काळजी घ्या

1- तुम्हाला आता मातृत्व विमा घ्यायचा आहे तेव्हा तो तुम्ही कोणत्याही कंपनीकडून जरी घेतला तरी त्याआधी या विम्यामध्ये कोणकोणत्या बाबी कव्हर केलेले आहेत याची संपूर्णपणे माहिती घ्यावी. तसेच रक्ताच्या चाचण्या किंवा अल्ट्रासाउंड चाचणी इत्यादी चाचण्यांचा समावेश यामध्ये असणे गरजेचे आहे.

2- प्रसूतीच्या पूर्वीचे लसीकरण तसेच नवजात शिशुची लसीकरण यांचाही त्यात समावेश आहे की नाही हे देखील बघावे.

3- लहान बाळाचे म्हणजेच नवजात शिशुचे आजार आणि त्यावरील उपचार इत्यादी बाबी पहिल्या दिवसापासून यामध्ये कव्हर होतील का हे देखील बघावे.

4- हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर त्या ठिकाणचे रूमचे भाडे तसेच कॅशलेस हॉस्पिटललायझेशन तसेच इतर रोगांवरील उपचार या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे की नाही हे देखील बघावे.

5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मातृत्व विमा पॉलिसीचा प्रतीक्षा कालावधी किती आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. साधारणपणे हा कालावधी दोन ते सहा वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

Ajay Patil