आर्थिक

कमी पैशात जास्त दिवस बोला आणि जास्त डेटा मिळवा! जिओचा ‘हा’ महत्त्वाचा प्लॅन झाला 200 रुपयांनी स्वस्त

Published by
Ajay Patil

Jio Recharge Plan:- भारतामध्ये जर बघितले तर यामध्ये रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय आणि एअरटेल या तीन कंपन्या प्रमुख असून या तीनही कंपन्यांची एकमेकांमध्ये स्पर्धा असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यातल्या त्यात भारतामध्ये रिलायन्स जिओचे युजर्स मोठ्या प्रमाणावर आहेत.

जर आपण जिओचे रिचार्ज प्लान किंवा डेटा प्लान बघितले तर ते एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या तुलनेमध्ये कमी आहेत. मागील काही दिवसांपूर्वी सर्वच कंपन्यांच्या माध्यमातून मोबाईल रिचार्जचे दर वाढवण्यात आलेले होते.त्यामुळे अनेक प्लानच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे व त्यामुळे आर्थिक फटका देखील बसला आहे.

जेव्हा रिलायन्स जिओने देखील रिचार्ज प्लानच्या किमती मध्ये वाढ केली होती तेव्हा जिओने 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन तब्बल 1199 रुपयांना केला होता.

परंतु आता जिओने या प्लॅनची किंमत दोनशे रुपयांनी स्वस्त केली असून तो परत 999 रुपयांमध्ये परत आणण्यात आलेला आहे. त्यामुळे जे जिओचे ग्राहक असतील त्यांच्यासाठी हा एक दिलासा म्हणावा लागेल.

या नवीन प्लॅनमध्ये आता काय बदल करण्यात आले आहेत?
जिओने या नवीन प्लॅनमध्ये आता काही बदल केले असून यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे या प्लॅनची वैधता वाढवण्यात आलेली आहे.

या अगोदर या प्लॅनची वैधता 84 दिवसांसाठी होती. परंतु आता कंपनीने यामध्ये 14 दिवसांची वाढ केली असून या प्लॅनची वैधता आता 84 ऐवजी 98 दिवस करण्यात आलेली आहे. तसेच दुसरा महत्त्वाचा बदल जर बघितला तर या प्लॅनमध्ये कंपनी दररोज तीन जीबी डेटा देत होती.

परंतु आता या नवीन प्लॅनमध्ये डेटा दोन जीबी इतका कमी करण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्लॅनमध्ये 252 जीबी डेटा ऐवजी 192 जीबी डेटा मिळणार आहे.जरी या प्लानमध्ये आता डेली डेटा कमी करण्यात आला असला तरी देखील 999 रुपयांच्या या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा उपलब्ध असणार आहे.

ग्राहकांना हा प्लॅन कसा फायद्याचा ठरेल?
जेव्हा जिओने रिचार्ज प्लानच्या दरामध्ये वाढ केली होती तेव्हा हा प्लान 1199 रुपयांना झाला होता व तो आता दोनशे रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. तसेच आता या प्लॅनची वैधता 84 दिवसांऐवजी 98 दिवस करण्यात आलेली आहे.

तसेच अनलिमिटेड 5G डेटा देखील यामध्ये मिळणार आहे.तसेच दररोज 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील यामध्ये मिळणार आहे

Ajay Patil