Tata Power Share : 17 जानेवारी 2025 म्हणजेच काल जर आपण एकंदरीत शेअर बाजाराची परिस्थिती बघितली तर सुरुवात ही घसरणीने झाली होती आणि मोठ्या घसरणीसह बाजार बंद झाला होता. परंतु असे असताना देखील काही कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र तेजीचे संकेत पाहायला मिळाले
व यामध्ये टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचा शेअर देखील फोकसमध्ये राहिला. या कंपनी शेअरबाबत काही फायद्याचे संकेत देण्यात आले असून काही टॉपच्या ब्रोकिंग फर्मच्या माध्यमातून टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर करण्यात आली आहे.
मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग फर्मने दिली टार्गेट प्राईस
प्रसिद्ध असलेल्या मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर कंपनी शेअर करिता खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यांनी या शेअरसाठी BUY कॉल दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग फर्मने या शेअरकरिता 509 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
ही लक्ष किंमत म्हणजेच टार्गेट प्राईस जर बघितली तर टाटा पॉवरच्या सध्याच्या किंमत पातळीपेक्षा तब्बल 45 टक्क्यांनी अधिक आहे.
टाटा पॉवर कंपनीबाबत जर एक सकारात्मक अपडेट बघितली तर या कंपनीने भूतानमध्ये एका प्रकल्पाच्या उभारणीकरिता 6900 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे याचा दीर्घकालीन फायदा टाटा पॉवर शेअरच्या गुंतवणूकदारांना देखील होण्याची शक्यता आहे.
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरची काय आहे सध्या स्थिती?
काल टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 1.25 टक्यांची वाढ झाली व या वाढीसह हा शेअर 373.50 रुपयांवर पोहोचला. या कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्याचा उच्चांकी स्तर जर बघितला तर तो 494.85 रुपये होता. तर 52 आठवड्यांचा निचांकी स्तर 335.30 रुपये होता.
लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने दिला आहे 3561.76 टक्क्यांचा परतावा
मागच्या पाच दिवसात या कंपनीच्या शेअरने सहा टक्के परतावा दिला व मागील एक महिन्यात मात्र या कंपनीचा शेअर ११.२६ टक्क्यांनी घसरला व मागील सहा महिन्यात या शेअरमध्ये 13.13 टक्क्यांची घसरण झालेली आहे.
मागील एक वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 7.08 टक्क्यांचा परतावा दिला असून मागील पाच वर्षात ५०६.२० टक्क्यांचा परतावा दिला आहे. इतकेच नाहीतर दीर्घ कालावधीमध्ये या शेअरने तब्बल 3561.76 टक्क्यांचा परतावा दिला आहे.