Tata Steel Share Target Price:- आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 20 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली व सुरुवातीलाच बाजारामध्ये आज तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये 311 अंकांची वाढ झाली व तो 76930 वर पोहोचला तर निफ्टी मध्ये देखील ७४ अंकांची वाढ होऊन तो 23 हजार 277 च्या पातळीवर पोहोचला.
त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसून आले व या सगळ्या तेजीच्या वातावरणामध्ये टाटा स्टील कंपनीच्या शेअरबाबत देखील मार्केट तज्ञांच्या माध्यमातून खूप महत्त्वाचे असे संकेत देण्यात आल्यामुळे आणि टाटा स्टील कंपनीबाबत एक मोठे अपडेट समोर आल्यामुळे येणाऱ्या कालावधीत या शेअरमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकेल अशा प्रकारची सद्यस्थिती दिसून आली आहे.
काय आहे सध्या टाटा स्टील शेअरची स्थिती?
आज शेअर मार्केटची सुरुवातच मुळात तेजीने झाली व या सगळ्या परिस्थितीमध्ये टाटा स्टील कंपनीच्या शेअरमध्ये देखील 0.11% ची वाढ झाली व या वाढीसह हा शेअर 130.42 रुपयांवर पोहोचला होता. जर आपण टाटा स्टीलच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी बघितली तर ती 184.7 रुपये तर 52 आठवड्यांची निचांकी पातळी 122.62 होती.
टाटा स्टील कंपनीकरिता ही अपडेट ठरेल फायद्याची
ओडिसा राज्यातील जी काही खनिज धारक जमीन आहे त्या जमिनीवर टॅक्स आकारण्यासंदर्भात टाटा स्टील लिमिटेड कंपनीने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक क्युरेटिव्ह याचिका दाखल केलेली असून या याचिकेच्या माध्यमातून कंपनीने असामान्य अधिकार क्षेत्राचा वापर करण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे या प्रदेशातील कंपनीच्या भविष्यातील जे काही कामकाज असेल त्यावर लक्षणीय असा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत टाटा स्टील शेअरने किती दिला आहे परतावा?
जर आपण टाटा स्टील लिमिटेड कंपनीच्या शेअरची एक वर्षाची कामगिरी बघितली तर या कंपनीच्या शेअरमध्ये 0.43 टक्क्यांची वाढ झालेली असून गेल्या पाच वर्षांमध्ये या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 170.29 टक्क्यांचा परतावा दिला आहे व दीर्घ कालावधी म्हणजेच लॉन्ग टर्ममध्ये या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल 1780 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईस
प्रसिद्ध असलेले ब्रोकरेज फर्मचे जेपी मॉर्गन यांनी टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत दिले व त्यासोबतच टाटा स्टील कंपनी शेअरसाठी त्यांनी 180 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केलेली आहे. इतकेच नाहीतर या ब्रोकरेज फर्मने या शेअरकरिता ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवलेली आहे.