आर्थिक

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारने निश्चित केले जीपीएफ अर्थात सामान्य भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर,ऑक्टोबर- डिसेंबरमध्ये मिळेल इतके व्याज

Published by
Ajay Patil

केंद्र सरकारी कर्मचारी असो किंवा राज्य सरकारी कर्मचारी यांच्याकरिता महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता, सामान्य भविष्य निर्वाह निधी अर्थात जीपीएफ आणि इतर भविष्य निर्वाह निधी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा सरकारकडून काही नवीन अपडेटची आतुरतेने कर्मचारी वाट पाहत असतात.

अगदी याच पद्धतीने तुम्ही देखील केंद्र सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी असून केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने सामान्य भविष्य निर्वाह निधी अर्थात जीपीएफ आणि इतर भविष्य निर्वाह निधीसाठीचा व्याजदर जाहीर केला आहे.

अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेला व्याजदर जर पाहिला तर तो एक ऑक्टोबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत 7.1% इतका असणार आहे. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की, सरकारने ऑक्टोबर डिसेंबर 2024 तिमाहीसाठी जीपीएफ आणि तत्सम लिंक्ड फंडावरील व्याजदरात मात्र बदल केलेला नाही.

 केंद्र सरकारने ऑक्टोबरडिसेंबर 2024 साठी जीपीएफ दर केले निश्चित

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 3 ऑक्टोबर 2024 रोजी वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने केलेल्या घोषणेनुसार बघितले तर सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि तत्सम निधींच्या ठेवींवर ऑक्टोबर ते डिसेंबर या तीमाहीत 7.1 टक्के दराने व्याज दिले जाणार असून सरकारने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

पीपीएफ वर जितके व्याज मिळत आहे तितकेच जीपीएफ वर देखील मिळणार आहे. जीपीएफ व्याजदर हे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजनेसारखेच असतात.

 या फंडांवर देखील मिळेल 7.1% दराने व्याज

जीपीएफ व्यतिरिक्त सामान्य भविष्य निर्वाह निधी( केंद्रीय सेवा ), अंशदायी  भविष्य निर्वाह निधी, अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी, राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी, सामान्य भविष्य निर्वाह निधी( संरक्षण सेवा), भारतीय अध्यादेश विभाग भविष्य निर्वाह निधी,

भारतीय आयुध विभाग कारखाने भविष्य निर्वाह निधी, भारतीय नौदल डॉकयार्ड कामगार( भविष्य निर्वाह निधी), संरक्षण सेवा अधिकारी भविष्य निर्वाह निधी, सशस्त्र दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी  या सगळ्यां निधिंवर देखील 7.1 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

 सामान्य भविष्य निर्वाह निधी अर्थात जीपीएफ म्हणजे नेमके काय?

जीपीएफ अर्थात सामान्य भविष्य निर्वाह निधी हा भविष्य निर्वाह निधीचा एक प्रकार आहे. फक्त तो भारतीय सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो. यामध्ये सरकारमधील प्रत्येक जण आपल्या पगाराचा काही भाग सामान्य भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करू शकतो

व जेव्हा कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला त्याच्या कालावधीत जमा केलेले पैसे आणि व्याज मिळते. जीपीएफ व्याजदराचा आढावा अर्थ मंत्रालय प्रत्येक तिमाहीत घेत असते.

Ajay Patil