शेअर बाजाराची कमाल ! ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल, एका लाखाचे झालेत 33 कोटी, कोणता आहे तो स्टॉक ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Multibagger Stock : शेयर बाजार एक ऐसा कुंआ है जो पूरे देश की प्यास बुझा सकता है ! हा सिनेमातला डायलॉग तुमच्या मुखोदगत असेल. या चित्रपटातील डायलॉग प्रमाणेच काही गुंतवणूकदारांची शेअर बाजाराने पैशांची तहान भागवली आहे. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला बंपर रिटर्न दिला आहे.

खरंतर शेअर बाजारात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. दीर्घ कालावधीत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना निश्चितच चांगला परतावा मिळतो. दरम्यान आज आपण अशाच एका स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत ज्याने दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. आज आपण ज्या शेअर बाबत जाणून घेणार आहोत त्याने वीस वर्षाच्या कालावधीत एका लाखाचे तब्बल 33 कोटी रुपये बनवले आहेत. यामुळे गुंतवणूकदार कोट्याधीश झाले आहेत.

कोणता आहे तो स्टॉक

आम्ही ज्या स्टॉकबाबत बोलत आहोत तो आहे बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेडचा. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. सोलार ग्लास बनवणाऱ्यां या कंपनीचा स्टॉक गेल्या 20 वर्षांपूर्वी अर्थातच नोव्हेंबर 2003 मध्ये शेअर बाजारात फक्त 13 पैशांवर ट्रेड करत होता. आता या स्टॉक ची किंमत 440.15 रुपये एवढी आहे. म्हणजेच या कालावधीत हा स्टॉक तब्बल 3 लाख 38 हजार टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न देऊन गेला आहे.

एका लाखाचे झालेत 33 कोटी

ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये वीस वर्षांपूर्वी विश्वास दाखवला असता त्या गुंतवणूकदारांना सध्याच्या घडीला मोठा बंपर परतावा मिळाला असता. वीस वर्षांपूर्वी जर गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर आजच्या घडीला सदर गुंतवणूकदाराला तब्बल 33 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली असती. शिवाय बोनस शेअर्स आणि स्टॉक प्लिटचा यामध्ये समावेश देखील केलेला नाही.

शेअर मार्केट मधील गेल्या तीन वर्षाची कामगिरी

या स्टॉक ने गेल्या तीन वर्षात शेअर मार्केट मध्ये चांगली कामगिरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये हा स्टॉक 34 रुपयांच्या आसपास ट्रेड करत होता. आता हा स्टॉक जवळपास 440.15 वर पोहोचला आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना 1155% रिटर्न मिळाला आहे. मात्र गेल्या एका वर्षाच्या काळात या स्टॉकने निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. गेल्या एका वर्षात स्टॉक ने 13.11% निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत.

डिसेंबर 2022 मध्ये या स्टॉक ची किंमत 506 रुपयांपेक्षा अधिक होती आता मात्र हा स्टॉक 440 रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यात देखील या स्टॉकने निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली असेल त्यांना निश्चितच यातून चांगला नफा मिळाला आहे. मात्र ज्यांनी अलीकडेच या स्टॉक मध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना नुकसान देखील सहन करावे लागले आहे.