चहा पत्तीच्या व्यवसाय आहे मोठं मार्जिन, ‘अशा’ पद्धतीने बिझनेस करा व लाखो कमवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या अनेक तरुण व्यवसायकडे वळत आहेत. अनेक लोक दररोजच्या नोकरपेक्षा व्यवसायाला कंटाळले आहेत. त्यांनाही काहीना काही बिझनेस करायचा असतो. तुम्ही जर यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते.

आज आम्ही तुम्हाला एक अतिशय भन्नाट बिझनेस आयडिया सांगणार आहोत. आपण हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता. सुमारे पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून हा व्यवसाय सुरू करता येईल.

हा बिजनेस म्हणजे चहापत्तीचा बिजनेस. बहुतेक घरांमध्ये सकाळची सुरुवात ही चहाने होते. चहा हे अतिशय लोकप्रिय पेय झाले आहे. त्यामुळे तुम्ही जर चहापत्तीचा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आसाम आणि दार्जिलिंगमधील चहा पत्ती ही सर्वोत्तम मानली जाते. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती आपण घेऊयात –

अशा पद्धतीने सुरु करा व्यवसाय :-हा व्यवसाय तुम्ही अनेक प्रकारे सुरू करू शकता. आपण बाजारात सुट्टा चहा विकू शकता. याशिवाय अनेक बड्या कंपन्या आहेत, ज्या सुट्टा चहा विकण्यासाठी फ्रँचायझी प्रोग्राम चालवतात. अतिशय कमी बजेटमध्ये तुम्हाला ही फ्रँचायझी मिळू शकते. इतकंच नाही तर या सेलवर चांगला फायदा मिळतो. याशिवाय आणखी एक पर्याय आहे. हा पर्याय म्हणजे तुम्ही घरोघरी जाऊन याची विक्री करू शकता.जर योग्य किमतीत तुम्ही चहा विकला तर नक्कीच तुम्हाला जबरदस्त फायदा होईल.

किती होईल कमाई :-चहापट्टीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आसाम आणि दार्जिलिंगमध्ये तुम्हाला 140 ते 180 रुपये प्रति किलो दराने घाऊक किमतीत चांगला चहा मिळेल. तुम्ही तो बाजारात 300 रुपये किलोपर्यंत ते विकू शकता. हा व्यवसाय अगदी 5 हजार रुपये गुंतवणूक करून देखील करू शकता. यातून तुम्ही दरमहा 20 हजार रुपये कमवू शकता. व्यवस्थित पॅकेजिंग किंवा ब्रँड जर केला तर तुमचा व्यवसाय अधिक वाढेल. आणि तुमची कमाई देखील जास्त वाढेल.