अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून बँक खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियमांत बदल होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. परंतु यामध्ये काही वृत्त जनसामान्यांसाठी धक्कादायक आहेत. त्यामध्ये तीन बातम्या सध्या ग्राहकांसाठी अस्वस्थ करणाऱ्या आहेत. ते तीन वृत्त म्हणजे
पीआयबीने केलेले ३ ट्विट
– १) पीआयबीने ट्वीट करून असे म्हटले आहे की, ‘एका मीडिया अहवालात असा दावा केला आहे की, काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. PIB Fact Check- हा दावा चुकीचा आहे. संबंधित बँकांनी असा कोणताही निर्णय घेतला नाही आहे.’
२) एका मीडिया अहवालात असा दावा केला आहे की जनधन खात्यातून प्रत्येक वेळी पैसे काढण्यासाठी 100 रुपये चार्ज केले जातील. PIB Fact Check- हा दावा चुकीचा आहे. जनधन खात्याच्या मोफत सेवांसाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही आहे. याबाबत आरबीआयच्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन होते.’
३) एका मीडिया अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, बँक ऑफ बडोदामध्ये बचत खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क वाढवण्यात आले आहे. PIB Fact Check- हा दावा चुकीचा आहे. बँक ऑफ बडोदाने असे सूचित केले आहे की बचत खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क वाढवले नाही. ‘
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved