Fixed Deposit Interest Rate 2023 : आपण सर्वजण कठोर मेहनतीने, काबाडकष्ट करून पैसे कमवतो. आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असतो. मग संसाराचा गाडा चालवून जो पैसा महिन्याकाठी शिल्लक राहतो तो पैसा विविध ठिकाणी गुंतवतो. एलआयसी, पोस्ट ऑफिसमध्ये असणाऱ्या विविध पॉलिसीमध्ये पैसे गुंतवले जातात. तर काही लोक शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांसारख्या थोड्याशा जोखीमपूर्ण ठिकाणी देखील पैसे लावतात.
मात्र बहुतांशी लोक हे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. यामुळे पोस्ट ऑफिस, एलआयसी आणि बँकमधील एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जर तुम्हीही एफडी करण्याचा प्लॅन करत असाल तर, थांबा ! आज आपण भारतातील कोणत्या प्रमुख तीन बँका आहेत ज्या एफडीवर चांगले व्याज देत आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. जर तुम्हाला एफडी मध्ये गुंतवणूक करायची असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया हा एक बेस्ट पर्याय राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये FD वर सर्वाधिक व्याजदर आहे.
ही बँक FD वर ७.१ टक्के व्याजदर ऑफर करत आहे. ही बँक तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर ६.८ टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के व्याजदर देत आहे. यामुळे तुमचाही एफटी करण्याचा विचार असेल तर एसबीआय मधून तुम्हाला चांगला व्याज परतावा मिळू शकणार आहे.
बँक ऑफ इंडिया : बँक ऑफ इंडिया देखील देशातील एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेचे लाखो खातेदारक आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना ही बँक चांगले व्याजदरही देते. ही बँक FD वर सर्वाधिक 7.25 टक्के एवढे व्याज ऑफर करत आहे. या बँकेत तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर ६.५० टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर ६.५० टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर ६ टक्के व्याजदर मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा येथील एफडी करणाऱ्यांसाठी चांगले व्याजदर देत आहे. जर तुम्ही एफडी मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या बँकेतील गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ही बँक मुदत ठेवींवर सर्वाधिक ७.२५ टक्के व्याज देत आहे. BOB पाच वर्षांच्या एफडीवर ७.२५ टक्के आणि तीन वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याजदर ऑफर करत आहे.