DA Hike :- केंद्र कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून महागाई भत्ता हा खूप महत्त्वाचा असून याचा सरळ परिणाम हा कर्मचाऱ्यांचे पगारावर होत असल्याकारणाने केंद्रीय सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत असलेल्या महागाई भत्तावाढी संदर्भातली प्रतीक्षा आता संपणार आहे.
कारण मिळालेल्या माहितीनुसार जुलै 2024 पासून जो काही महागाई भत्ता लागू होणार आहे त्यावर आता जवळपास शिक्कामार्फत झालेले आहे.
कारण ऑल इंडिया कंजूमर प्राईस इंडिया अर्थात एआयसीपीआयची जून 2024 चे आकडे आता जारी करण्यात आले आहे व या आकडेवारी नंतर आता सातव्या वेतन आयोगा अंतर्गत पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना व निवृत्तीवेतनधारकांना लाभ होईल असे म्हटले जात आहे.
महागाई भत्त्यात होईल तीन टक्क्यांनी वाढ?
जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून त्यानुसार बघितले तर 2024 पासून लागू होणारा महागाई भत्त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. कारण एआयसीपीआयची जून 2014 चे आकडे आता जारी करण्यात आलेले आहेत व त्यानंतर कर्मचारी सातवा वेतन आयोग अंतर्गत पगार घेतात व जे निवृत्तीवेतनधारक आहेत त्यांना याचा लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या जर आपण मिळणाऱ्या महागाई भत्त्याची स्थिती पाहिली तर ती जानेवारी 2024 पासून 50 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे. जर आपण जानेवारी ते जून 2024 या कालावधीसाठी असलेली एआयसीपीआय- आयडब्ल्यू इंडेक्स आकडेवारी बघितली तर त्यामध्ये तब्बल 1.5 अंकांनी वाढ झालेली आहे.
मे महिन्यामध्ये इंडेक्स 139.9 अंकावर होता व तो आता 1.5 अंकांनी वाढून 141.4 वर पोहोचला आहे. यामुळेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण जानेवारी महिन्यामध्ये एआयसीपीआय इंडेक्स 138.9 अंकांवर होता व तेव्हा महागाई भत्ता 50.84 टक्क्यावर पोहोचला होता.
जुलै 2024 पासून लागू होणार महागाई भत्ता
केंद्रीय कर्मचाऱ्यांना जो काही महागाई भत्ता मिळेल त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर पर्यंत होईल अशी शक्यता असून जरी ही घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होईल तरीदेखील जुलै 2024 पासून महागाई भत्ता लागू केला जाईल.
त्यामध्ये जुलै तसेच ऑगस्ट या महिन्याचा महागाई भत्ता हा एरियर अर्थात थकबाकीच्या रूपात दिला जाईल. यामध्ये जून 2024 पर्यंतच्या एआयसीपीआयच्या आकड्यानुसार सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किती महागाई भत्त्यात वाढ होईल हे ठरवले जाणार आहे.