Categories: आर्थिक

गुड न्यूज ! देशातील ‘या’ 10 बँका कमी व्याजदरात देतात पर्सनल लोन, एकदा यादी पहा…

Published by
Ahmednagarlive24 Office

Personal Loan : अलीकडे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांसाठी संसाराचा गाडा चालवणे देखील मुश्किलीचे होऊन बसले आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे महिन्याकाठी येणारा पगार किंवा उत्पन्न घर खर्चासाठीच संपत आहे.

हेच कारण आहे की अनेकांना काही वैयक्तिक कारणांसाठी पर्सनल लोन घ्यावे लागते. इमर्जन्सीच्या वेळी अनेक लोक वैयक्तिक कर्ज घेतात. पर्सनल लोन निश्चितच आपात्कालीन परिस्थितीमध्ये फायदेशीर ठरते.

मात्र जाणकार लोक पर्सनल लोन खूपच अडचण असेल तेव्हाच घेतले पाहिजे असा सल्ला देतात. याचे मुख्य कारण म्हणजे पर्सनल लोन देताना बँका अधिकचे व्याजदर घेतात. इतर कोणत्याही कर्जाच्या तुलनेत पर्सनल लोन साठी असलेले व्याजदर हे खूपच अधिक आहे.

यामुळे पैसे अड्जस्ट करण्यासाठी जेव्हा कोणताच पर्याय समोर नसेल अशावेळी पर्सनल लोन चा विचार करा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. दरम्यान, आज आपण अशा काही बँकांची यादी पाहणार आहोत जे इतर बँकांपेक्षा कमी व्याजदरावर पर्सनल लोन पुरवत आहेत.

कमी व्याज दरात पर्सनल लोन देणाऱ्या देशातील टॉप 10 बँका

1) बँक ऑफ महाराष्ट्र 10%
2) बँक ऑफ इंडिया 10.25%
3)एक्सिस बैंक 10.49%
4)आईडीएफसी फर्स्ट बैंक 10.49%
5) एचडीएफसी बैंक 10.50%
6) आईसीआईसीआई बैंक 10.50%
7) एसबीआई 10.55%
8) कोटक महिंद्रा बैंक 10.99%
9) टाटा कैपिटल 10.99%
10) बजाज फिनसर्व 11.00%

किती लोन मिळू शकत

मीडिया रिपोर्टनुसार, ग्राहकांना 50 हजार रुपये ते 30 लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन बँकेच्या माध्यमातून मिळू शकते. पर्सनल लोन परतफेड करण्यासाठी एक वर्ष ते पाच वर्षांपर्यंतचा कालावधी दिला जातो. म्हणजेच लोन टेन्यूर पाच वर्षांपर्यंतच असते.

दरम्यान वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पगारदार लोकांना सॅलरी स्लिप, सेल्फ एम्प्लॉईड लोकांसाठी उत्पन्नाचा पुरावा, आयटीआर, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा अशा काही कागदपत्रांची गरज लागणार आहे.

Ahmednagarlive24 Office