FD Interest Rates 2024 : तुम्ही तुमचे पैसे मुदत ठेवीमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर लक्षात घ्या की अनेक बँकांनी मे महिन्यात त्यांचे दर सुधारित केले आहेत, म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. या यादीत SBI, DCB बँक, IDFC फर्स्ट बँक यांचा समावेश आहे. आजच्या या बातमीत आपण या बँकांच्या व्याजदरांबद्दल जाणून घेणार आहोत.
DCB बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडी दर सुधारित केले आहेत. नवीन दर 22 मे पासून लागू होतील, बँक सध्या 19 महिने ते 20 महिन्यांच्या FD वर सर्वाधिक व्याज देत आहे. बँक सर्वसामान्यांना 8.05 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.55 टक्के व्याज देत आहे.
आईडीएफसी फर्स्ट बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील दर सुधारित केले आहेत. हे दर 15 मे पासून लागू झाले आहेत. सध्या बँक सर्वसामान्य नागरिकांना 3 टक्के ते 7.9 टक्के व्याज देत आहे आणि एफडी 7 दिवस ते 10 वर्षांसाठी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अतिरिक्त दिला जात आहे. 500 दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर उपलब्ध आहेत, जेथे सामान्य नागरिकांना 7.9 टक्के व्याज मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.4 टक्के व्याज मिळत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ठराविक कालावधीसाठी एफडीचे दर वाढवले आहेत. नवीन दर 15 मे पासून लागू झाले आहेत. 180 दिवस ते 210 दिवसांच्या FD साठी, व्याजदर 25 बेस पॉईंट्सने 6 टक्क्यांनी वाढवले आहेत. यापूर्वी 5.75 टक्के व्याज दिले जात होते.
211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी व्याजदर 6 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे. एक वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 6.8 टक्के व्याज दिले जात आहे. 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 7 टक्के व्याज दिले जात आहे.