Fixed Deposit Interest Rate : जेव्हा आपल्याला बचत करावीशी वाटते तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पहिला पर्याय येतो तो म्हणजे मुदत ठेव. कारण मुदत ठेव हा पर्याय गुंतवणूसाठी सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. मुदत ठेवींमधून ग्राहकांना हमखास परतावा मिळतो. अशातच तुम्हीही मुदती ठेवीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
मे 2024 मध्ये, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, सिटी युनियन बँक, RBL बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेसह अनेक बँकांनी त्यांच्या FD व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. या बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवले आहेत.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी त्यांच्या FD व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. सुधारित दर 1 मे 2024 पासून लागू झाले आहेत. या दुरुस्तीनंतर बँक सामान्य नागरिकांना 4 टक्के ते 8.50 टक्के व्याजदर देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.60 टक्के ते 9.10 टक्के व्याजदर बँक देत आहे. 2 वर्षे ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसामान्य नागरिकांना 8.50 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.10 टक्के व्याजदर दिला जात आहे.
सिटी युनियन बँक
सिटी युनियन बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी एफडी व्याजदर सुधारित केले आहेत. सुधारित FD व्याजदर 6 मे 2024 पासून प्रभावी आहेत. बँक सामान्य नागरिकांसाठी 5 टक्के ते 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 टक्के ते 7.75 टक्के व्याजदर देत आहे. 400 दिवसांच्या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर दिला जात आहे.
आरबीएल बँक
RBL बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी FD व्याजदर सुधारित केले आहेत. सुधारित FD व्याजदर 1 मे 2024 पासून प्रभावी आहेत. RBL बँक 18 ते 24 महिन्यांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वाधिक 8 टक्के व्याजदर देते. त्याच FD कालावधीवर, ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के म्हणजे 8.50 टक्के अतिरिक्त व्याजदर मिळेल आणि अति ज्येष्ठ नागरिक (80 वर्षे आणि त्यावरील) 0.75 टक्के म्हणजेच 8.75 टक्के अतिरिक्त व्याजदरासाठी पात्र आहेत.
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी FD व्याजदर सुधारित केले आहेत. सुधारित दर 6 मे 2024 पासून लागू होणार आहेत. बँक सर्वसामान्य नागरिकांना 3.5 ते 7.55 टक्के दराने व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 टक्के ते 8.05 टक्के व्याजदर देत आहे. सर्वाधिक व्याज 400 दिवसांच्या कालावधीवर दिले जात आहे.