Senior Citizen : दीर्घकाळापर्यंत मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी त्यात कपात करण्यास सुरुवात केली आहे. परंतु अशा अनेक लहान फायनान्स बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर देत आहेत.
आज आपण याचा बँकांबद्दल बोलणार आहोत, या बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ९ ते ९.५० टक्के व्याजदर देत आहेत. सध्या देशातील अशा कोणत्याच बँका नाहीत, ज्या एवढ्या प्रमाणात व्याजदर ऑफर करतील, चला तर मग कोणत्या आहेत या बँका जाणून घेऊया…
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.50 टक्के ते 9.50 टक्के व्याजदर देत आहे. बँक 1001 दिवसांच्या FD वर सर्वाधिक 9.50 टक्के व्याज देत आहे. तर सामान्य ग्राहकांना 4.50 ते 9.00 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँकेप्रमाणेच, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक देखील त्यांच्या एफडी योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना जोरदार परतावा देत आहे. बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.60 टक्के ते 9.11 टक्के व्याजदर देत आहे. 750 दिवसांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना सर्वोच्च व्याज दर म्हणजेच 9.11 टक्के ऑफर केले जात आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 3.50 टक्के ते 9.00 टक्के व्याजदर देत आहे. बँक 2 ते 3 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज दर म्हणजेच 9 टक्के परतावा देत आहे.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना महागाईवर मात करण्यास सक्षम असलेल्या FD योजनांवर उत्कृष्ट व्याजदर देत आहे. बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.50% ते 9.10% पर्यंत व्याजदर देत आहे. बँक 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त व्याजदर देत आहे.
ESAF स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.50 टक्के ते 9.50 टक्के व्याजदर देखील देत आहे. बँक 2 ते 3 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक व्याज दर म्हणजेच 9 टक्के परतावा देत आहे.