Post Office Schemes : सध्या बाजारात अनेक गुंतवणूक योजना आहेत, पण या सर्व योजना जोखमीच्या आहेत, गुंतवणूकदार अशा योजनांच्या शोधात असतात जिथे त्यांना पैशांच्या सुरक्षिततेसह फायदाही मिळेल, अशा ग्राहकांसाठी पोस्ट ऑफिस योजना उत्तम पर्याय आहेत, होय येथील योजना या सर्वात सुरक्षित योजना मानल्या जातात. कारण येथील पैशांच्या सुरक्षेची हमी केंद्र सरकार घेते.
अनेक काळापासून पोस्टाच्या योजना गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवण्याचे काम करत आहेत, अशातच जर तुम्हीही येथे गुंतवणूक करून तुमचे श्रीमंत होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला येथील 5 योजनांबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर खूप जास्त परतावा ऑफर करत आहेत.
पहिली म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम, येथे तुम्ही 3 वर्षांसाठी पैसे जमा केल्यास तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज मिळेल, तर 5 वर्षांसाठी पैसे ठेवल्यास 7.5 टक्के दराने व्याज मिळेल.
दुसरी म्हणजे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही दरमहा उत्पन्न देणारी योजना आहे. यामध्ये तुम्हाला 7.4 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
तिसरी म्हणजे पीपीएफ योजना.दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पीपीएफ ही एक चांगली योजना आहे. EEE श्रेणीच्या या योजनेत तुम्हाला तीन प्रकारे कर लाभही मिळतात. सध्या 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
चौथी म्हणजे NSC म्हणून ओळखली जाणारी योजना ही 5 वर्षांची ठेव योजना आहे. या योजनेत तुम्हाला 7.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. एकरकमी रक्कम जमा करून, तुम्ही 5 वर्षांत याद्वारे चांगले पैसे कमवू शकता.
पाचवी योजना खास महिलांसाठी चालवली जाते. या योजनेचे नाव महिला सम्मान सेविंग्स सर्टिफिकेट असे आहे. या योजनेत 2 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात. सध्या या योजनेवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे.