आर्थिक

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 बचत योजना म्हणजे लाखो रुपये परतावा मिळवण्याची हमी! परंतु करात सवलत मिळते का?

Published by
Ajay Patil

Post Office Best Saving Scheme:- गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि चांगला परतावा मिळावा या दृष्टिकोनातून सध्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांचा ट्रेंड हा पोस्ट ऑफिसच्या योजनांकडे देखील आपल्याला दिसून येतो. पोस्ट ऑफिसच्या अनेक अशा सेविंग स्कीम असून या योजनांमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर व्याजदर चांगला मिळतो व गुंतवणुकीवर परतावा देखील उत्तम मिळतो.

पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये तुम्हाला कर लाभ मिळतो.परंतु काही योजनांवर मात्र कर लाभ मिळत नाही. परंतु गुंतवणुकीवर परतावा मात्र चांगला मिळतो.

दुसरे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजना या गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असल्याने बिनधास्तपणे गुंतवणूक करून चांगला परतावा आपल्याला मिळवता येऊ शकतो.

त्यामुळे या लेखात आपण पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना बघणार आहोत की त्यात गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा मिळतो. परंतु कर लाभ किंवा करात सवलत मात्र मिळत नाही.

पोस्ट ऑफिसच्या आकर्षक अशा बचत योजना

1- नॅशनल सेविंग टाईम डिपॉझिट अकाउंट- पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही एक वर्ष, दोन, तीन किंवा पाच वर्षाकरिता टाईम डिपॉझिट खाते उघडू शकतात. तुम्हाला जर नंतर इच्छा असेल तर तुम्ही हा कालावधी वाढवू शकतात. याकरिता तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये एक फॉर्म भरावा लागतो.

नॅशनल सेविंग टाईम डिपॉझिट अकाउंट मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर एक वर्षाकरिता 6.9%, दोन वर्षाच्या कालावधी करिता सात टक्के आणि तीन वर्षासाठी 7.1% इतके व्याज मिळते.

या अंतर्गत पाच वर्षाच्या ठेवींवर तुम्हाला आयकर सूट मिळू शकते. आयकर कायदा 1961 अंतर्गत पाच वर्षाच्या ठेवींवर दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सुट उपलब्ध आहे. परंतु यापेक्षा जर कमी गुंतवणूक असेल तर मात्र कर सवलत मिळत नाही.

2- राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते- पोस्ट ऑफिसची ही एक हमी योजना असून तुम्हाला पाच वर्षाकरिता वार्षिक आधारावर 6.7 टक्के व्याज या योजनेत दिले जाते. तसेच तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा फायदा देखील मिळतो.

या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्ही एकटे किंवा एकत्र म्हणजे जॉईंट अकाउंट देखील उघडू शकतात. प्रत्येक महिन्याला किमान शंभर रुपये जमा करून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकतात व कमाल ठेवींवर म्हणजे जास्तीत जास्त कितीही ठेव तुम्ही या योजनेत ठेवू शकतात.

3- किसान विकास पत्र- किसान विकास पत्र ही देखील पोस्ट ऑफिसची एक फायदेशीर योजना आहे. परंतु या योजनेत तुम्ही जर गुंतवणूक केली तर तुम्हाला कर सवलत मात्र मिळत नाही. किसान विकास पत्र योजनेमध्ये जमा केलेली रकमेवर जे काही वार्षिक व्याज मिळते ते इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न म्हणून करपात्र आहे.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या बाबतीत एक उत्तम बाब अशी आहे की मुदत पूर्ण झाल्यानंतर जे पैसे तुम्ही काढतात त्या पैशांवर मात्र टीडीएस कापला जात नाही.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला करात सवलत मिळत नसली तरी देखील एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून किसान विकास पत्र योजना अतिशय उत्तम योजना आहे.

4- पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना- गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना देखील अतिशय चांगला पर्याय आहे. या योजनेमध्ये तुम्ही 1500 रुपयांपासून ते जास्तीत जास्त नऊ लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकतात. तुमचे जर जॉइंट अकाउंट असेल तर पंधरा लाख रुपयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकतात.

या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला 7.4% इतके व्याज मिळते. परंतु या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर देखील कर सवलत मात्र मिळत नाही. चाळीस हजार रुपये पेक्षा जर जास्त व्याज असेल तर त्यावर टीडीएस कापला जातो व ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस हा पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त व्याजावर कपात केला जातो.

5- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना- भारत सरकारची महिला सन्मान बचत पत्र योजना ही प्रामुख्याने महिलांसाठी तयार केलेली एक लहान बचत योजना आहे. ही योजना सुरू करण्यामागील जर महत्त्वाचा उद्देश बघितला तर भारतीय महिलांमध्ये बचतीची सवय विकसित व्हावी व नियमित बचत करता यावी याकरिता ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्याकरिता कुठल्याही प्रकारची वयोमर्यादा नाही. फक्त तुम्ही याकरिता भारताचे नागरिक असणे गरजेचे आहे. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर देखील तुम्हाला करात सवलत मिळत नाही.

यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या कर स्लॅब आणि व्याज उत्पन्नावर अवलंबून महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून जे काही व्याज मिळते त्यावर टीडीएस कापला जातो.

Ajay Patil