Fixed Deposit : जर सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर एफडी पेक्षा दुसरा कोणताच पर्याय तुमच्यासाठी चांगला नसेल, कारण येथे पैसे गमावण्याचा धोका खूप कमी आहे. तुम्हाला देशातील सर्व बँका तसेच पोस्ट ऑफिस मुदत ठेवींची सुविधा पुरवतात, पण प्रत्येक बँकेचे मुदत ठेवींवरील व्याजदर हे वेगवेगळे असतात.
अशातच तुमच्यासाठी कोणत्या बँकेची एफडी फायद्याची ठरेल हे जाणून घेणे कठीण असते, म्हणूनच आज आम्ही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या सध्या चांगला परतावा ऑफर करत आहेत.
उच्च रेपो दरामुळे, SBI, बँक ऑफ बडोदा आणि HDFC बँकेसह सर्व बँका FD वर उच्च व्याजदर देत आहेत. आज आपण याच बँकांचे व्याजदर पाहणार आहोत, चला तर मग…
एचडीएफसी बँक
HDFC बँक FD वर 3 टक्के ते 7.25 टक्के व्याजदर देत आहे. 18 ते 21 महिन्यांच्या FD वर बँकेकडून सर्वाधिक 7.25 टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, बँक 2 वर्षे 11 महिने ते 35 महिन्यांच्या एफडीवर 7.15 टक्के व्याज आणि 4 वर्षे 7 महिने ते 55 महिन्यांच्या एफडीवर 7.20 टक्के व्याज देत आहे. याशिवाय, बँक एक वर्ष ते 15 महिन्यांच्या मुदत ठेवींवर 6.6 टक्के व्याजदर देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया गुंतवणूकदारांना 3.5 ते 7 टक्के व्याजदर देत आहे. बँकेकडून 2 ते 3 वर्षांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक 7 टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, 3 वर्षे ते 5 वर्षांच्या FD मध्ये गुंतवणूकदारांना 6.75 टक्के व्याज दिले जात आहे. याशिवाय बँक गुंतवणूकदारांना 5 ते 10 वर्षांच्या FD वर 6.5 टक्के व्याज देत आहे. बँक एक ते दोन वर्षांच्या एफडीवर 6.8 टक्के व्याज देत आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा एफडीवर 4.25 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. बँक 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, बँक 399 रुपयांच्या एफडीवर 7.15 टक्के व्याजदर देत आहे. बँक 360 दिवसांच्या विशेष मुदत ठेवींवर 7.10 टक्के व्याज देत आहे. याशिवाय एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी एफडीवर गुंतवणूकदारांना 6.85 टक्के व्याज दिले जात आहे.
आयसीआयसीआय बँक
ICICI बँक गुंतवणूकदारांना 3 ते 7.2 टक्के व्याजदर देत आहे. 15 महिने ते 2 वर्षांच्या कालावधीसाठी FD वर बँकेकडून जास्तीत जास्त 7.20 टक्के व्याज दिले जात आहे. त्याच वेळी, 2 वर्षे ते 5 वर्षांच्या FD वर गुंतवणूकदारांना 7 टक्के व्याजदर दिला जात आहे. एक वर्ष ते 15 महिन्यांच्या एफडीवर 6.7 टक्के व्याजदर दिला जात आहे.