आर्थिक

‘या’ बँका मुलांच्या उज्वल भविष्यासाठी राबवतात आकर्षक मुदत ठेव योजना! मुलांच्या नावाने कराल एफडी तर मुलांचे भविष्य होईल सुरक्षित

Published by
Ajay Patil

Fixed Deposit Scheme For Kids:- फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव हा एक गुंतवणुकीचा जोखीममुक्त असा पर्याय असून मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीसाठी लोकप्रिय असलेला प्रकार म्हणून देखील मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिटला ओळखले जाते.

मुदत ठेव योजनांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मुलांचे भविष्य देखील पैशांच्या म्हणजेच आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित करू शकतात. सध्या देशातील अनेक बँका या मुलांसाठी विशेष एफडी योजना ऑफर करत असून चांगले व्याज देखील या माध्यमातून मिळणार आहे.

नियमित मुदत ठेव योजनांच्या तुलनेमध्ये मुलांसाठी असलेल्या या एफडी योजनांमध्ये जास्त सुविधा देखील मिळतात. यामध्ये पालक त्यांच्या मुलांच्या नावे मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करू शकतात. जेणेकरून भविष्यामध्ये आर्थिक गरज पडेल तेव्हा मुलांच्या बाबतीत यामुळे अडचण येणार नाही.

या बँक राबवतात मुलांसाठी आकर्षक व्याज योजना

1- स्टेट बँक ऑफ इंडिया- एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून या बँकेच्या माध्यमातून देखील मुलांकरिता विशेष एफडी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत किमान एक हजार रुपये गुंतवणूक करता येते व कमाल गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही.

परंतु गुंतवणूक जर दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला बल्क डिपॉझिट म्हटले जाते. यावरील व्याज तीन टक्के ते 7.10% पर्यंत आहे. स्टेट बँकेच्या माध्यमातून या एफडी करिता किमान सहा महिने आणि कमाल दहा वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला आहे.

2- येस बँक- खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची असलेली येस बँक देखील मुलांसाठी एफडी योजना चालवत असून या योजनेचा कालावधी सात दिवस ते दहा वर्षापर्यंत आहे. यावर व्याजदर जर बघितला तर तो 3.25% पासून ते 7.50% पर्यंत आहे. किमान गुंतवणुक ही दहा हजार रुपये असून जास्तीत जास्त कितीही गुंतवणूक करता येते.

3- पीएनबी स्पेशल एफडी स्कीम– पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँक देखील मुलांसाठी विशेष एफडी योजना चालवत असून या एफडी योजनेचे नाव पीएनबी उत्तम नॉन कॉलेबल मुदत ठेव योजना असे असून यामध्ये दहा वर्षाची मुले देखील फायदा घेऊ शकतात. या योजनेमध्ये गुंतवणुकीची श्रेणी 15 लाख रुपये पासून ते दहा कोटी रुपये पर्यंत आहे व मुदत ठेव कालावधी हा 91 दिवसापासून ते दहा वर्षापर्यंत उपलब्ध आहे.

4- कॅनरा बँक स्पेशल एफडी- सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाची असलेली कॅनरा बँक देखील मुलांसाठी विशेष मुदत ठेव योजना चालवत असून या बँकेच्या योजनेत तुम्हाला किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. या बँकेच्या माध्यमातून तुम्ही सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीत एफडी करू शकतात व यावर 3.25% ते 7.15 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो.

5- एचडीएफसी बँक किड्स एफडी- देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेली एचडीएफसी बँकेने देखील एचडीएफसी बँक किड्स एडवांटेज अकाउंट नावाची विशेष योजना सुरू केली आहे

व यामध्ये बचत खात्यात 35 हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक शिल्लक असल्यास ठेवीतून पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त रक्कम तुम्ही ऑटोमॅटिक मुदत ठेव मध्ये रूपांतरित करू शकतात. या योजनेत एफडीचा कालावधी एक वर्ष आणि एक दिवस आहे.

Ajay Patil