FD Rate Hike : आजच्या काळात सध्या गुंतवणुकीचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत आपण कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी याबाबत अनेक वेळा संभ्रम निर्माण होतो. प्रत्येकाला आपण केलेल्या गुंतवणुकीतून उच्च परतावा मिळवायचा असतो. म्हणूनच आज आम्ही अशा योजना सांगणार आहोत, जिथून तुम्ही सुरक्षिततेसह तुमच्या गुंतवणुकीवर बक्कळ परतावा देखील कमावू शकता.
जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि FD योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा बँकांबद्दल सांगत आहोत ज्या ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.
-AU Small Finance Bank ज्येष्ठ नागरिकांना 18 महिन्यांच्या FD वर 8.50 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी, ESAF स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 2 ते 3 वर्षांच्या FD वर 8.5 टक्के व्याज देत आहे.
-Fincare Small Finance बँक ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांच्या FD वर 9.00 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, जन स्मॉल फायनान्स बँक केवळ 365 दिवसांच्या एफडीवर 9 टक्के व्याज देत आहे.
-उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 15 महिन्यांच्या FD योजनेवर 9 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक 2 ते 3 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांसाठी FD योजनेवर 9.10 टक्के व्याज दर देत आहे.
-नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ग्राहकांना 555 दिवस आणि 1111 दिवसांच्या FD वर 9.25 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक देखील 2 वर्षे आणि एक महिन्याच्या FD वर 9.25 टक्के व्याज दर देत आहे.
-युनिटी स्मॉल फायनान्स बँक 1001 दिवसांच्या FD वर 9.50 टक्के व्याजदर देत आहे.