आर्थिक

सर्वात स्वस्त Personal Loan ! 5 लाख रुपये लोन घेतले तर फक्त इतका EMI…

Published by
Ajay Patil

आयुष्यात येणाऱ्या आपत्कालीन आर्थिक गरजा भागवण्यासाठी व सणासुदीच्या कालावधीमध्ये जर मोठ्या प्रमाणावर खरेदी करायची असेल तर याकरिता बरेचजण वैयक्तिक अर्थात पर्सनल लोन घेण्याचा पर्याय निवडतात. दिवसेंदिवस पर्सनल लोन घेण्याच्या संख्येमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे.

परंतु जर आपण होमलोन किंवा वाहन कर्ज यांच्या तुलनेत जर बघितले तर पर्सनल लोनचा व्याजदर हा सर्वात जास्त असतो. त्यामुळे जर तुम्हाला जास्त प्रमाणात व आवश्यक अशी पैशांची गरज असेल तेव्हाच तुम्ही हा पर्याय निवडणे गरजेचे आहे.

बँकांचे व्याजदर कसे आहेत ?

यासोबत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पर्सनल लोन घेणे अगोदर तुम्ही वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर कसे आहेत याची तुलना करून बघणे खूप महत्त्वाचे आहे व ज्या ठिकाणाहून तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज मिळेल अशा बँकेकडून कर्ज घेणे तुमच्या हिताचे ठरते. त्यामुळे आपण या लेखात अशा काही बँकांची माहिती घेणार आहोत ज्या कमी व्याजदरामध्ये पर्सनल लोन देतात.

 या बँका देतात कमी व्याजदरात पर्सनल लोन

1- एचडीएफसी बँक ही बँक देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असून या बँकेकडून जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर त्यावर 10.5 टक्के व्याज आकारते. जर तुम्ही या बँकेकडून पाच वर्षाकरिता पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला दहा हजार 747 रुपये ईएमआय भरावा लागेल.

2- आयसीआयसीआय बँक या बँकेकडून जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर बँकेकडून यावर 10.8 टक्के व्याजदर आकारण्यात येतो. आयसीआयसीआय बँकेकडून तुम्ही पाच वर्षाकरिता पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला दहा हजार आठशे एकवीस रुपये एमआय भरावा लागेल.

3- पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेकडून पर्सनल लोन वर 10.4 टक्के व्याजदर आकारण्यात येत आहे. समजा तुम्ही पंजाब नॅशनल बँकेकडून पाच लाख रुपयांचे पर्सनल लोन पाच वर्षांसाठी घेतले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार सातशे बहात्तर रुपये ईएमआय भरावा लागेल.

4- कॅनरा बँक तुम्ही जर कॅनरा बँकेच्या माध्यमातून पर्सनल लोन घेतले तर यावर बँकेकडून 10.95% व्याजदर आकारण्यात येत असून बँकेकडून तुम्ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेत असाल तर तुम्हाला दहा हजार 859 रुपये ईएमआय भरावा लागेल.

5- बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र कडून जर तुम्ही पर्सनल लोन घेतले तर त्यावर ही बँक दहा टक्के इतका व्याजदर आकारते व या बँकेकडून जर तुम्ही पाच वर्षांकरिता पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार सहाशे चोवीस रुपये ईएमआय भरावा लागेल.

6- बँक ऑफ इंडिया तुम्ही जर बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पर्सनल लोन घेतले तर यावर बँकेकडून 10.85% व्याजदर आकारण्यात येत आहे. तुम्ही जर बँक ऑफ इंडियाकडून पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला दहा हजार आठशे चौतीस रुपये ईएमआय भरावा लागेल.

7- कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँक पर्सनल लोनवर 10.99% इतका व्याजदर आकारात असून तुम्ही जर या बँकेकडून पाच वर्षांसाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला दहा हजार 869 रुपये ईएमआय म्हणून भरावे लागतील.

Ajay Patil