State Bank of India : सरकाकडून लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अशातच शेतकऱ्यांसाठी देखील अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जात आहे.
यातलीच एक योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना. या अंतर्गत शेतकऱ्यांना पीक वाढण्यापूर्वी नांगरणी आणि बियाणे खरेदी करण्यासाठी रोख रक्कम दिली जात आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती आणि इतर गरजांसाठी बँकिंग प्रणालीद्वारे कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आजच जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड (KCC) खाते उघडावे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेअंतर्गत खाती उघडली जात आहेत.
शेतकऱ्यांना शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने किफायतशीर व्याजदरात आणि सुलभ मार्गाने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना चालवली जात आहे. या योजनेद्वारे शेतकरी कमाल 7 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.
कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार व्याजदरात 3 टक्के सूट देत आहे. अशा प्रकारे योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जावर केवळ 4 टक्के व्याज द्यावे लागेल.
देशातील प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ दिला जात आहे. अर्जासाठी 18 ते 75 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत खते, बियाणे, कृषी यंत्रे, मत्स्यपालन, पशुपालन यासह अनेक प्रकारच्या शेतीशी संबंधित कामांसाठी कर्ज दिले जाते.