आर्थिक

कमी गुंतवणुकीतील ‘हे’ छोटे व्यवसाय लवकर श्रीमंत होण्यासाठी करतात मदत! कायम हातात खेळता राहील पैसा

Published by
Ajay Patil

Low Investment Business Idea:- जास्त गुंतवणूक किंवा जास्त पैसा टाकून एखाद्या व्यवसायाला सुरुवात केली तर त्यापासून जास्त नफा मिळवता येणे शक्य होते हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते. परंतु हे शंभर टक्के सत्य नाही. जर आपण सध्याची परिस्थिती बघितली तर अगदी लहान स्वरूपातील व्यवसायांमध्ये पैसा जास्त मिळतो ही सत्य परिस्थिती आहे.

कारण लहान व्यवसाय सुरू करायचे म्हणजे जागेची आवश्यकता भासत नाही किंवा जागा कमीत कमी लागते व पैसा देखील कमी लागतो व इतकेच नाहीतर मनुष्यबळ देखील लागत नाही. एकटा व्यक्ती देखील छोटासा स्वरूपात एखादा व्यवसाय सुरू करू शकतो व चांगल्या पद्धतीने यामधून पैसा मिळवू शकतो.

त्यामुळे एखादा व्यवसायाची सुरुवात जर करायची असेल तर कुठलाही मोठा युनिट किंवा मोठा व्यवसाय सुरू करण्यापेक्षा मागणी पाहून जर एखादा छोट्या व्यवसायाला सुरुवात केली तर नक्कीच पैसा जास्त प्रमाणात कमावता येणे शक्य आहे.

या दृष्टिकोनातून आपण असे काही छोटे व्यवसाय बघणार आहोत की तुम्ही अगदी कमीत कमी पैशात सुरू करू शकतात व त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात.

हे छोटे व्यवसाय लवकर श्रीमंत होण्यासाठी करतील मदत

1- फूड ट्रक व्यवसाय- सध्या हा व्यवसाय खूप ट्रेडिंग असून या व्यवसायातील फूड ट्रक म्हणजे एक छोटीशी पिकअप किंवा एक छोटेसे वाहन घेऊन त्यामध्ये फळाची व इतर खाद्यपदार्थ ठेवून ते विकणे होय. अशा पद्धतीने फूड ट्रक तुम्ही कुठेही नेऊ शकतात व त्या ठिकाणी विक्री करू शकतात किंवा बाजारांमध्ये जाऊन देखील तुम्हाला चांगली विक्री करता येते.

फूड ट्रक तयार करण्याकरिता तुम्ही कुठल्याही वाहनाची निवड करू शकतात. एखादी मालवाहतूक करणारी थ्री व्हीलरचा वापर तुम्ही जर केला किंवा छोटी पिकअप घेतली तरी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. या गाडीच्या मागे तुम्ही किचनचा आकार देऊन त्यामध्ये फास्ट फूड तयार करून रस्त्यावर त्यांची विक्री करू शकतात.

2- बेकरीचे पदार्थ विक्री करणे- या व्यवसायामध्ये तुम्ही केक, पाव तसेच ब्रेड, केक व बिस्किट इत्यादी सकाळच्या नाश्त्यासाठी आवश्यक असणारे खाद्यपदार्थ घरी तयार करून बाजारामध्ये विकू शकतात.

स्वतःची बेकरी सुरू करून देखील हे पदार्थ तयार करून त्यांची विक्री करू शकतात. तुमची बेकरी नसेल तर तुम्ही एखाद्या बेकरीवाल्याकडून हे बनवलेले पदार्थ खरेदी करून त्याची विक्री करू शकतात.हा कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा उत्तम असा व्यवसाय आहे.

3- जुन्या दुचाकींची खरेदी-विक्री- सध्या जुन्या दुचाकी घेण्याचा ट्रेंड देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो. सध्या जुन्या दुचाकी गाड्यांच्या खरेदी विक्रीचे मार्केट देखील खूप वाढल्याचे दिसून येते. तसे पहिला गेले तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त पैशांची आवश्यकता भासत नाही.

परंतु त्या तुलनेत मात्र या व्यवसायातून मिळणारे कमिशन जास्त असते. एकंदरीत कमाईचे स्वरूप बघितले तर एक दुचाकी तुम्ही खरेदी किंवा विक्री केली तर या एका व्यवहारामध्ये तुम्ही एका मजुराचा दहा दिवसांचा पगार इतका पैसा एका दुचाकीच्या खरेदी विक्री मागे मिळवू शकतात.

एका महिन्यामध्ये तुम्ही तीन दुचाकी जरी विकल्या किंवा व्यवहार केला तरी कंपनीत काम केल्यावर तुम्हाला जितका पगार मिळेल त्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही बाहेर फिरून मिळवू शकतात. या व्यवसायामध्ये फक्त तुम्हाला ग्राहक शोधायचे असतात व ज्या लोकांना जुन्या गाड्या विकायच्या आहेत त्यांच्याशी संपर्कात राहावे लागते.

साधे उदाहरण घ्यायचे झाले तर एखादी दुचाकी जर 35 हजार रुपयाला विकायची असेल व तिची किंमत तुम्ही चाळीस हजार रुपये करून जर विकली तर तुम्हाला एका गाडीमागे पाच हजार रुपयाचे कमिशन मिळते. अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा मिळवू शकतात.

4- मोबाईलचे गोरीला ग्लास विकणे- मोबाईल जुना असो वा नवा प्रत्येकजण मोबाईलला ग्लास बसवून घेतो. समजा मोबाईल पडला तरी त्याचा डिस्प्ले खराब होऊ नये किंवा डिस्प्लेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये याकरिता मोबाईलच्या डिस्प्लेवर गोरिला ग्लास बसवून घेणे फायद्याचे ठरते.

हा ग्लास 40 ते 50 रुपयांना विकला जातो. परंतु होलसेल दरामध्ये तुम्हाला तो 20 ते 30 रुपयाला मिळतो. अशा प्रकारे तुम्ही होलसेल दरात गोरीला ग्लास विकत आणून ते तुम्ही 40 ते 50 रुपयाला विकू शकतात. म्हणजेच एका ग्लास बसवण्यामागे तुम्ही दहा ते वीस रुपये कमाई करू शकतात.

अशाप्रकारे तुम्ही दिवसाला 30 ग्लास जरी बसवले तरी तुम्ही दिवसाला सहाशे रुपये आरामात कमवू शकतात व महिन्याला 18 हजार रुपयांची कमाई करू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही एक टू व्हीलर वर एक बॉक्स ठेवून बाजारामध्ये किंवा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी तुमची गाडी उभी करून तुम्ही हा व्यवसाय करू शकतात.

Ajay Patil