Rule Of Loan Guarantor:- बऱ्याचदा आपण बघतो की,जेव्हा आपले मित्र किंवा नातेवाईक यांना कुठल्याही पद्धतीचे कर्ज घ्यायचे असते तेव्हा ते कर्ज मिळवताना बँकेच्या काही अटी असतात व त्या अटी पूर्ण करणे खूप गरजेचे असते. ज्याप्रमाणे कुठल्याही बँकेतून कर्ज घेताना सिबिल स्कोर बघितला जातो.
अगदी त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीला लोन घेण्यासाठी गॅरेंटरची देखील आवश्यकता असते. त्यामुळे बरेचजण आपले नातेवाईक आहेत म्हणून किंवा मित्र आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवतात व तो घेत असलेल्या कर्जाला गॅरेंटर बनतात. परंतु अशा पद्धतीने एखाद्याच्या लोनला गॅरेंटर होणे हे खूप जोखमीचे काम आहे. नाहीतर उगीचच तुम्हाला देखील यामध्ये मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते.
दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनणे का आहे धोक्याचे?
1- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनणे हे पाहिजे तितके सोपे नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या कर्जासाठी गॅरेंटर बनतात तेव्हा कर्ज घेत असलेल्या व्यक्तीची त्या कर्जासंबंधी जितकी जबाबदारी असते तितकीच पूर्ण जबाबदारी तुम्ही देखील या माध्यमातून घेत असतात. यामध्ये जर त्या संबंधित व्यक्तीने जर कर्ज भरले नाही तर मात्र तुम्ही देखील यामध्ये अडकू शकतात व तुम्हाला संपूर्ण पैसे भरावे लागू शकतात.
2- समजा एखाद्या कर्ज घेणाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर संपूर्ण कर्ज गॅरेंटरला भरावे लागू शकते. अशावेळी बँकांसाठी लोन गॅरेंटर एक प्रकारे कर्जदाता बनतो.
3- तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला गॅरेंटर व्हायचे असेल तर त्या व्यक्तीची कर्ज फेडण्याची आर्थिक परिस्थिती आहे का हे तपासणे गरजेचे आहे. परंतु संबंधित व्यक्तीची आर्थिक परिस्थिती जर हवी तितकी चांगली नसेल तर मात्र तुम्ही स्पष्टपणाने नकार देणे चांगले.
एखाद्याच्या कर्जासाठी गॅरेंटर झाल्यानंतर नाव मागे घेता येते का?
बऱ्याचदा व्यक्ती कर्जासाठी गॅरेंटर होते परंतु त्याला नंतर आपले नाव परत घ्यावी अशी इच्छा उत्पन्न होते. बऱ्याच व्यक्तींना या संदर्भात प्रश्न असतो. यामध्ये लोन गॅरेंटर म्हणून नाव तुम्ही परत घेऊ शकतात. याकरिता फक्त तुम्हाला आणि कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला बँकेमध्ये जाऊन एक विनंती अर्ज पाठवावा लागतो. अशावेळी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला दुसरा लोन गॅरेंटर मिळाला की तुमचे नाव लगेच गॅरेंटर लिस्ट मधून काढले जाते.