Personal Loan : सगळ्यात लवकर मिळणारे कर्ज म्हणजे वैयक्तिक कर्ज, हे कर्ज सर्वाधिक व्याजदर असलेले कर्ज आहे. हे फेडण्यासाठी तुम्हाला भरपूर व्याज द्यावे लागतात. अशास्थितीत वैयक्तिक कर्ज घेताना विचारपूर्वकच घ्यावे.
सध्या वेगवेगळ्या बँका वैयक्तिक कर्जावर वेगवेगळे व्याजदर आणि इतर ऑफर देत आहेत. त्यामुळे हे कर्ज घेण्यापूर्वी सर्व बँकांच्या ऑफर्स जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. लक्षात घ्या वैयक्तिक कर्जाचा दर देखील ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरवर आणि त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर अवलंबून असतो.
जर ग्राहक सरकारी कर्मचारी असेल किंवा चांगल्या कंपनीत काम करत असेल आणि त्याचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर त्याला कमी व्याजदराने वैयक्तिक कर्ज मिळू शकते. देशातील प्रमुख बँका वैयक्तिक कर्जावर किती व्याजदर देत आहेत चला जाणून घेऊया…
HDFC बँक
एचडीआरएफसी बँक, देशातील सर्वात मोठी खाजगी बँक, वैयक्तिक कर्जावर सर्वात कमी व्याजदर देणाऱ्या बँकांपैकी एक आहे. त्याच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 10.50 टक्क्यांपासून सुरू होतो. प्रक्रिया शुल्क 4,999 रुपयांपर्यंत आहे.
टाटा कॅपिटल
NBFC कंपनी टाटा कॅपिटल वैयक्तिक कर्जावर 10.99 टक्के प्रारंभिक व्याज दर देत आहे. प्रक्रिया शुल्क 5.5 टक्क्यांपर्यंत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI च्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 11.15 ते 15.30 टक्क्यांच्या दरम्यान आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1.50 टक्के आहे.
ICICI बँक
ICICI बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 10.80 टक्क्यांपासून सुरू होतात. प्रक्रिया शुल्क 2 टक्क्यांपर्यंत आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा (BOB) च्या वैयक्तिक कर्जावरील व्याज दर 11.05 ते 18.75 टक्के दरम्यान आहेत. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2 टक्क्यांपर्यंत आहे.
ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँक वैयक्तिक कर्जावर 10.49 टक्के व्याजदर देत आहे. प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 2 टक्के आहे.
कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँक वैयक्तिक कर्जावर 10.99 टक्के व्याजदर देत आहे. प्रक्रिया शुल्क 3 टक्क्यांपर्यंत आहे.