‘या’ बँकेने होम लोन आणि कार लोनवरील व्याजदरात केली मोठी वाढ ! नवीन वर्षात ग्राहकांना बसणार मोठा फटका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan And Car Loan : नवीन वर्षात सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे. कारण की नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच देशातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसीने आपल्या ग्राहकांसाठी होम लोन आणि कार लोन वरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे सर्वसामान्यांना नवीन वर्षात मोठा फटका बसणार आहे. खरतर आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. वाढती महागाई सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. अशातच आता एचडीएफसी बँकेकडून दिल्या जाणाऱ्या होम लोन, कार लोन सारख्या फ्लोटिंग कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे याचा हजारो नागरिकांना फटका बसणार आहे. विशेष म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्थातच आरबीआयने रेपो रेट मध्ये गेल्या तीन तिमाहीत वाढ केलेली नाही. रेपो रेट जसे होते तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र गेल्या दीड वर्षांचा विचार केला असता रेपो रेटमध्ये अडीच टक्क्यांची वाढ झाली आहे.

परंतु अलीकडील काही काळात रेपो रेटमध्ये वाढ झालेली नाही. पण एचडीएफसी बँकेने आरबीआयने रेपो रेट मध्ये वाढ केलेली नसतानाही त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या काही मुदतीच्या कर्जावर एमएलसीआर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम म्हणून सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण येणार आहे.

कारण की होम लोन आणि कारलोनच्या व्याजदरात वाढ होणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे वाहन कर्ज, गृह कर्ज, वैयक्तिक कर्जासह इतर सर्व प्रकारच्या फ्लोटिंग कर्जामधील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांनी वर्तवली आहे. याचा परिणाम नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

विशेष म्हणजे एचडीएफसी बँकेने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. बँकेने MCLR हा 0.10 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे आता होम लोन, कार लोन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ होणार आहे. बँकेच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार,

एका महिन्याचा एमएलसीआर ५ bps ने ८.७५ टक्क्यांवरून ८.८० टक्के करण्यात आला आहे. तीन महिन्यांचा एमएलसीआरदेखील पूर्वीच्या ८.९५ टक्क्यांवरून वाढवून ८.९० टक्के करण्यात आलाय. सहा महिन्यांचा एमएलसीआर ९.२० टक्के झालाय.

एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.२५ टक्के झाला आहे. २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.२५ टक्के करण्यात आला आहे. ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमएलसीआर ९.३० टक्के करण्यात आलाय. त्यामुळे आता वेगवेगळ्या कर्जावरील व्याजदर वाढणार असून यामुळे ईएमआय वाढणार आहे.