FD News : तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. खरेतर आज आपण तीनशे दिवसांच्या एफडीवर सर्वोच्च व्याजदर देणाऱ्या बँकेची माहिती पाहणार आहोत. अलीकडे सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिटला विशेष महत्त्व दिले जात आहे.
बँकेच्या फिक्स डिपॉझिटमध्ये केलेली गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. शिवाय अलीकडे बँकांच्या माध्यमातून फिक्स डिपॉझिटसाठी चांगले व्याज देखील दिले जात आहे. यामुळे गुंतवणूकदार आता फिक्स डिपॉझिट कडे वळू लागले आहेत. महिला देखील सोन्याऐवजी आता फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याला विशेष पसंती दाखवत आहेत.
यामुळे बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्पेशल एफडी स्कीम देखील लाँच करत आहेत. यामध्ये आयडीबीआय बँकेचा देखील समावेश होतो. मिळालेल्या माहितीनुसार, आयडीबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन उत्सव एफडी योजना लॉन्च केली आहे.
या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा सुद्धा दिला जात आहे. आता आपण या उत्सव एफडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
उत्सव FD योजना
आयडीबीआय बँकेकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्सव एफडी योजना सुरू करण्यात आली आहे. ही एफडी योजना 300, 375 आणि 444 दिवसांची आहे. दरम्यान या वेगवेगळ्या कालावधीच्या उत्सव एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना वेगवेगळे व्याज ऑफर केले जात आहे.
300 दिवसाच्या उत्सव एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर यामध्ये गुंतवणूकदारांना 7.55 टक्क्याचे व्याज ऑफर केले जात आहे. दुसरीकडे 375 दिवसांच्या उत्सव FD योजनेत सामान्य गुंतवणूकदारांना 7.10% आणि जेष्ठ नागरिकांना 7.60% एवढे व्याज ऑफर केले जात आहे. 444 दिवसांच्या एफडीबाबत बोलायचं झालं तर यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांना 7.25% आणि जेष्ठ नागरिकांना 7.75% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.
योजनेत गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत
मात्र ही उत्सव एफडी योजना काही मर्यादित कालावधीसाठीच सुरू राहणार आहे. बँकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही विशेष एफडी योजना 31 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे ग्राहकांना एफडीवर जर अधिकचा परतावा मिळवायचा असेल तर 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करावी लागणार आहे. या विहित कालावधीनंतर सदर योजनेत गुंतवणूक करता येणार नाही.