आर्थिक

ग्रामीण भागात लाखो रुपये कमवण्याची संधी देतो ‘हा’ व्यवसाय! कराल ‘अशा पद्धती’चे प्लानिंग तर कमवाल लाखोत

Published by
Ajay Patil

Business Idea:- ग्रामीण भागामध्ये अनेक प्रकारचे व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतात व या माध्यमातून कमीत कमी भांडवलात तुम्ही चांगल्या प्रकारे नफा देखील मिळवू शकतात. ग्रामीण भागामध्ये शेती व शेतीशी निगडित असलेल्या जोडधंद्यांच्या संबंधित असलेल्या व्यवसायांना खूप चांगल्या पद्धतीने मागणी दिसून येते.

ग्रामीण भागाचा प्रमुख व्यवसाय शेती व त्यासोबतच पशुपालन असल्याने पशुपालनाची निगडित असलेला पशुखाद्य दुकान किंवा ॲनिमल फीड स्टोअरचा जर तुम्ही व्यवसाय सुरू केला तर या व्यवसायातून ग्रामीण भागात खूप चांगल्या पद्धतीने पैसे मिळवता येणे शक्य आहे.

विशेष म्हणजे हा व्यवसाय तुम्ही शहरी भागात देखील सुरू करू शकतात. सध्या पशुपालन व्यवसाय दूध उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्याकारणाने जनावरांच्या खाद्याला किंवा चाऱ्याला खूप महत्त्व दिले जाते व त्या दृष्टिकोनातून पशुखाद्याला अनन्य साधारण महत्व आहे व त्यामुळे पशुखाद्याचे दुकानाची उभारणी करून तुम्ही या क्षेत्रातून चांगला नफा कमवू शकतात.

अशा पद्धतीने तयार करा व्यवसायाची प्लॅनिंग
कुठलाही व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल व तो सुरळीतपणे चालावा असे वाटत असेल तर त्याकरिता प्रथम तुमची व्यवसायाविषयी एक स्पष्ट अशी योजना तयार करणे गरजेचे असते.

तसेच या व्यवसायासाठी देखील तुम्ही स्पष्ट अशी व्यवसाय योजना तयार करा व यामध्ये दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला किती भांडवल लागेल याची स्पष्टपणे माहिती मिळवा.

तसेच पशुखाद्य विक्रीमध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे पशुखाद्य विकायचे आहे ते अगोदर निश्चित करा. म्हणजे यामध्ये दुग्धजन्य जनावरांचे खाद्याची विक्री करायची आहे की कोंबडी खाद्य किंवा माशांचे खाद्य इत्यादीचा विचार तुम्ही करू शकतात.

योग्य स्थान निवडा
तुम्हाला ज्या ठिकाणी पशुखाद्य विक्रीचे दुकान टाकायचे असेल त्या दुकानासाठी अशी जागा शोधा की त्या ठिकाणी पशुपालक म्हणजेच ग्राहक सहजपणे पोहोचू शकतील. बाजारपेठेच्या जवळ जर तुम्ही असे दुकान उघडले तर खूप चांगला फायदा होतो.

पशुखाद्याचा प्रकार आणि गुणवत्तेकडे लक्ष द्यावे
तुमच्या पशुखाद्य विक्री दुकानांमध्ये तुम्ही विविध प्रकारचे खाद्य ठेवू शकतात जसे की, दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांसाठी केक, मका तसेच हिरवा चारा व इतर तसेच पोल्ट्रीसाठी लेयर फीड आणि ब्रॉयलर फीडचा समावेश करू शकतात. तसेच ग्राहकांचा विश्वास टिकून राहावा याकरता उच्च आणि दर्जेदार अशा खाद्याची विक्री करणे गरजेचे आहे.

आवश्यक परवाने मिळवा
पशुखाद्य विक्री व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्थानिक प्राधिकरणांकडून तुम्हाला परवाना घ्यावा लागतो. तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या अन्न आणि चारा सारख्या इतर मानकांचे पालन करणे गरजेचे आहे.

मार्केटिंग आणि जाहिरात
तुमच्या पशुखाद्य विक्री दुकानाची जाहिरात करणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना तुमच्या दुकानाबद्दल माहिती मिळेल. याकरिता तुम्ही सोशल मीडियाचा वापर करू शकता किंवा शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून जाहिरात करू शकतात. तसेच विक्री करताना वेळोवेळी आकर्षक ऑफर किंवा सुट देऊन तुम्ही ग्राहकांना आकर्षित करू शकतात.

तसेच वितरणासाठी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही खाद्य ऑर्डरनुसार घरपोच केले तर खूप चांगल्या पद्धतीने विक्री वाढू शकते ग्रामीण भागामध्ये ग्राहकांसाठी ही सुविधा खूप फायद्याची ठरू शकते.

जास्त नफा मिळवण्यासाठी या पर्यायांचा वापर करा
पशुखाद्यासोबत तुम्ही पशुवैद्यकीय औषधे तसेच विटामिन सप्लीमेंट आणि इतर प्राण्यांची आवश्यक उत्पादने देखील विकू शकतात. तुम्ही जर ऑनलाईन विक्री सुविधा सुरू केली तर ताबडतोब तुम्हाला ग्राहक मिळू शकतील आणि तुम्ही कमी वेळेत चांगले पैसे कमवू शकतात.

Ajay Patil