Bank of Baroda FD : अलीकडे गुंतवणुकीसाठी बरेच पर्याय उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड सारख्या जोखीमपूर्ण ठिकाणी देखील आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाऊ लागली आहे, असे असले तरी देखील देशात असे अनेक लोक आहेत जे अजूनही एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, कारण एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
सध्या सरकारी आणि खाजगी दोन्ही बँकांमध्ये एफडीवर प्रचंड व्याजदर दिला जात आहे. या बँका वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना दिलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदर अपडेट करतात. अशातच देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदाने देखील आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. सध्या बँक आपल्या ठेवींवर बंपर परतावा देत आहे.
बँक ऑफ बडोदाने नुकतेच आपले एफडी दर सुधारित केले आहेत, बँकेने 12 फेब्रुवारी 2024 रोजी 2 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदर बदलेले आहेत.
बँक ऑफ बडोदाचे एफडीवरील व्याजदर :-
-7-14 दिवस आणि 15-45 दिवसांच्या FD साठी व्याजदर 5 टक्के आहे.
-बँक 46 दिवस ते 90 दिवसांच्या ठेवींवर 5.75 व्याज दर देत आहे.
-180 दिवस ते 110 दिवसांच्या याच कालावधीवर 6.75 टक्के व्याज मिळत आहे.
-3 ते 5 वर्षांच्या FD वर बँक 6 टक्के व्याज देत आहे.
-5 वर्षे ते 10 वर्षे मुदत ठेवींवर 5 टक्के व्याज दिले जात आहे.
-सरकारी बँक ऑफ बडोदा 7 दिवस ते 10 वर्षांच्या बल्क एफडीवर 5 टक्के ते 7.80 टक्के पर्यंत व्याज देत आहे.
-तर, 2 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या 1 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 7.45 टक्के व्याज दिले जात आहे.
-बँक 1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींवरबँक 6.85 टक्के व्याज देत आहे.