Stock To Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी 2023 हे वर्ष खूपच खास ठरले आहे. या चालू वर्षात शेअर बाजारातील तेजी गुंतवणूकदारांसाठी खूपच फायदेशीर ठरली आहे. शेअर बाजारातील अनेक स्टॉक्सने गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे.
या चालू वर्षात गुंतवणूकदारांनी अक्षरशा खोऱ्याने पैसा ओढला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पण हे शेअर बाजारातील तेजीचे वर्ष आता येत्या तीन-चार दिवसात संपणार आहे. त्यानंतर 2024 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे.
दरम्यान जाणकार लोकांनी शेअर बाजारातील ही तेजी आगामी काही महिने अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. येत्या 2024 या वर्षात देखील शेअर बाजारात तेजी राहण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांना निश्चितच चांगला परतावा मिळणार आहे.
पण यासाठी योग्य स्टॉकची निवड गुंतवणूकदारांना करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही 2024 साठी काही दर्जेदार स्टॉक शोधत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप खास राहणार आहे. कारण की आज आपण तज्ञांनी विश्वास दाखवलेल्या एका स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत.
तज्ञांनी आरोग्य सेवा उद्योगातील नारायण हृदयालय या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमधून 2024 मध्ये चांगला परतावा मिळू शकतो असा दावा तज्ञांनी केला आहे. मार्केट तज्ज्ञ अंबरिश बालिगा यांनी नारायण हृदयालयात खरेदीचा सल्ला दिला आहे.
शेअर बाजारातील तज्ज्ञ अंबरीश बालिगा म्हणाले की, नवीन वर्षात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांनी नारायण हृदयालयाची निवड करायला हवी. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी मात्र 1440 रुपयांचे टार्गेट ठेवावे. नारायण हृदयालयाच्या शेअरने 2023 मध्ये गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून दिला आहे.
या वर्षी शेअरने गुंतवणूकदारांना 60 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉक सुमारे 21 टक्क्यांनी वाढला आहे. आरोग्य सेवा क्षेत्रातील या कंपनीचा शेअर गुरुवारी सुमारे 1 टक्क्यांनी वाढला आणि 1,198 रुपयांवर बंद झाला आहे. BSE वर कंपनीचे मार्केट कॅप 24,497.75 कोटी रुपये नोंदवले गेले.