आर्थिक

सरकारच्या ‘या’ योजना विधवा महिलांना करतात आर्थिक सहाय्य; आर्थिक बाबतीत महिलांना होता येते स्वयंपूर्ण, वाचा माहिती

Published by
Ajay Patil

सरकारच्या समाजातील अनेक घटकांसाठी विविध प्रकारच्या आर्थिक लाभाच्या योजना असून या योजनेच्या माध्यमातून या घटकांना आर्थिक मदत करण्यात येते. कधी ही मदत कर्ज स्वरूपात केली जाते किंवा अनुदान स्वरूपात केली जाते. कित्येक योजना या अशा घटकांना व्यवसाय उभारणीसाठी देखील कर्ज देतात किंवा अनुदान देतात.

जेणेकरून अशा घटकांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचवावा हा सरकारचा प्रामुख्याने उद्देश असतो. याचप्रमाणे जर आपण विधवा महिलांचा विचार केला तर या महिलांच्या जीवन जगण्याच्या दृष्टिकोनातून काही सरकारच्या योजना या खूप महत्त्वाच्या आहेत.

दुर्दैवाने एखाद्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर मात्र मुला बाळांचे संगोपन आणि लागणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी अशा महिलांना आर्थिक मदत या योजनांच्या माध्यमातून होते व जेणेकरून त्यांचे जीवन सुकर व्हावे हा त्यामागचा उद्देश असतो.

 महिलांसाठी सरकारच्या या योजना आहेत फायद्याच्या

1- विधवा पेन्शन योजना या योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या महिलेच्या पतीचे अकाली निधन झाले असेल तर अशा महिलांना या योजनेच्या माध्यमातून पेन्शनची सुविधा मिळते. ही योजना देशातील सर्व राज्यांमध्ये लागू असून राज्य निहाय त्यामध्ये प्रक्रिया मात्र वेगवेगळे आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना खूप फायद्याची आहे.

2- महिला हाट योजना ही योजना सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून राबवण्यात येते व हा एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे ज्या माध्यमातून महिला त्यांच्याकडे असलेल्या कला कौशल्यातून पैसे कमवू शकतात व आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात.

3- महिला शक्ती केंद्र योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. विधवा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. या योजनांच्या माध्यमातून महिलांना आरोग्य तसेच रोजगार आणि डिजिटल साक्षरता इत्यादी सुविधा पुरवल्या जातात.

4- इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा मुख्य उद्देश आहे की आर्थिक दृष्ट्या कमकुवत व्यक्तींना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणे होय. महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात व महिलांसाठीच ही योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. ज्या महिलांचे वय 40 वर्षापेक्षा जास्त आणि 59 वर्षापेक्षा कमी आहे अशा विधवा महिलांना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला तीनशे रुपयांची मदत केली जाते.

5- शिलाई मशीन योजना 2020 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शिलाई मशीन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिला किंवा विधवा महिलांना रोजगार मिळणे शक्य होते. गरजू महिलांना या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन वाटप करण्यात येते.

Ajay Patil